ETV Bharat / briefs

केरळ सोने तस्करी : स्वप्ना सुरेश यांच्या बँक लॉकर्समधून 1 किलो सोन्यासह 1 कोटी रुपये जप्त

author img

By

Published : Jul 25, 2020, 5:03 PM IST

एनआयएने स्वप्ना यांच्या नावे फेडरल बँकेच्या तिरुवनंतपुरम शाखेतील लॉकरमधून 36.5 लाख रुपये जप्त केले आहेत. तर स्वप्ना यांच्या नावे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया येथील तिरुवनंतपुरम शाखेतील लॉकरमधून 64 लाख रुपये रोकड आणि 982.5 किलो सोन्याचे आभूषण जप्त केले आहेत.

Nia
Nia

एर्नाकुलम (केरळ)- तामिळनाडू विमानतळावर डिप्लोमॅटिक बॅगेज यंत्रणेद्वारे सोन्याची तस्करी करण्यात आली होती, या प्रकरणी तपास करणाऱ्या राष्ट्रीय अन्वेषण विभागाने स्वप्ना सुरेश यांच्या नावी असलेल्या दोन बँकेतील लॉकर्समधून 1 किलो सोने आणि 1 कोटी रुपये जप्त केले आहेत.

न्यायालयाला दिलेल्या अहवालानुसार, एनआयएने स्वप्ना यांच्या नावे फेडरल बँकेच्या तिरुवनंतपुरम शाखेतील लॉकरमधून 36.5 लाख रुपये जप्त केले आहेत. तर स्वप्ना यांच्या नावे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया येथील तिरुवनंतपुरम शाखेतील लॉकरमधून 64 लाख रुपये रोकड आणि 982.5 किलो सोन्याचे आभूषण जप्त केले आहेत.

याबाबत, सापडलेले आभूषण हे स्वप्ना याना दुबईतील एका शेखने त्यांच्या लग्नात भेट दिले असल्याचे स्वप्नाच्या वकिलाने सांगितले आहे. दरम्यान, न्यायालयाने स्वप्ना यांच्या मुलांना त्यांना भेटण्यासाठी परवानगी दिलेली आहे. स्वप्ना यांनी न्यायालयाला, सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी आपल्याला मानसिक त्रास दिला व दबाव टाकून आपल्याकडून बायन नोंदवून घेतल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, स्वप्नना यांना ताब्यात ठेवण्यासाठी एनआयएला न्यायालयाने जो कालावधी दिला होता, तो संपुष्टात आला आहे. न्यायालयाने सदर प्रकरणात आरोपी असलेल्या स्वप्ना सुरेश व संदीप नाय्यर याना 21 ऑगस्ट पर्यंत न्यायिक कोठडी सुनावली आहे. दोघांनाही एर्नाकुलमच्या कक्कानाड येथील जिल्हा तुरुंगात टाकण्यात आले आहे. तसेच, 29 जुलैला जमीन याचिकेवर सुनावणीबाबत न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.