मुंबई - २०१५ साली झालेल्या विश्वकरंडकात रनर-अप असलेला न्यूझीलंड संघ यावेळी पुन्हा एकदा दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. विश्वकरंडकासारख्या महत्वाच्या स्पर्धेपूर्वीच न्यूझीलंडचा खेळाडू टॉम लाथम जायबंदी झाला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सराव सामन्यात यष्टीरक्षण करताना त्याला दुखापत झाली आहे. त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झाले आहे. टॉम लाथम न्यूझीलंड संघासोबत इंग्लंडला जाणार आहेत. मात्र, तो पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. त्याचसोबत विश्वकरंडकापूर्वी तो दोन्ही सराव सामन्यांत खेळणार नाही.
न्यूझीलंडने पर्यायी यष्टीरक्षक म्हणून टॉम ब्लंडेलला निवडले आहे. त्याने आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळलेला नाही. विश्वकरंडकात त्याला पदार्पणची संधी मिळू शकते. न्यूझीलंडचा पहिला सामना श्रीलंकेशी होणार आहे.
निवड समितीचे प्रमुख गॅविन लार्सन यांनी म्हटले आहे, की लाथम सराव सामने खेळणार की नाही, यावर मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर निर्णय घेतला येईल.