ETV Bharat / briefs

मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलारांनी केली मान्सून पूर्व नालेसफाईच्या कामांची पाहणी - mumbai bjp president

मुंबईतील गजधरबंद नाला, वाळभाट नदी, ए. पी. आई नाला, सोमय्या नाला, पोस्टल कॉलनी नाला ह्या नाल्यांना आशिष शेलारांनी भेट देवून तेथील कामांचा आढावा घेतला.

mumbai news
Mumbai BJP president Ashish Shelar inspected the pre-monsoon nala cleaning work
author img

By

Published : Jun 7, 2020, 8:04 PM IST

मुंबई - माजी शिक्षणमंत्री आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज (रविवारी) मुंबईत मान्सून पूर्व कामांची पाहणी केली. यामध्ये त्यांनी प्रामुख्याने मुंबईतील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. मुंबईतील गजधरबंद नाला, वाळभाट नदी, ए. पी. आई नाला, सोमय्या नाला, पोस्टल कॉलनी नाला ह्या नाल्यांना आशिष शेलारांनी भेट देवून तेथील कामांचा आढावा घेतला.

सरकारने मान्सून पूर्व नालेसफाईच्या कामांमधून ह्या वर्षी किती गाळ साफ केला ह्याचा हिशोब मुंबईकरांना द्यावा. शेलारांनी आपल्या भेटीत प्रामूख्याने पुढील मुद्द्यांवर भाष्य केले. मुंबईमधील नाल्यांची पाहणी केली असता 40 ते 45 टक्केच काम झाले असून 60 टक्के काम होणे बाकी आहे. नाल्यांमधला गाळ काढून तो गाळ नाल्यांच्या बाहेरच टाकला डात आहे. हा गाळ डम्पिंगवर टाकला जात नाही. खासगी सरकारी डम्पिंगवर किती गाळ जमा केला याचा हिशोब द्यावा, असेही शेलार म्हणाले. भाजपची नाळ मुंबईकरांशी जोडलेली आहे. मुंबईकरांना सेवा देणाऱ्या कामात जो दिरंगाई करेल त्याचा सामना भाजप करेल असेही आशिष शेलार म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.