ETV Bharat / briefs

Pune Corona Update : पुणे विभागातील 8 हजार 571 रुग्ण कोरोनामुक्त - pune division corona updates

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.91 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. यापैकी पुणे जिल्ह्यातील 10 हजार 643 बाधित रुग्ण आहेत. यातील 6 हजार 682 कोरोनाबाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर, ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 3 हजार 509 आहे.

पुणे विभाग
पुणे विभाग
author img

By

Published : Jun 11, 2020, 8:18 PM IST

पुणे - विभागातील 8 हजार 571 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13 हजार 625 झाली आहे. तर, ॲक्टीव रुग्ण 4 हजार 431 आहेत. तर, विभागात आतापर्यंत एकूण 623 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 271 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.91 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. यापैकी पुणे जिल्ह्यातील 10 हजार 643 बाधित रुग्ण आहेत. यातील 6 हजार 682 कोरोनाबाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर, सध्या ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 3 हजार 509 आहे. तर, 452 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 244 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.78 टक्के आहे. कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात एकूण 597 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 562, सातारा जिल्ह्यात 20, सोलापूर जिल्ह्यात 2, सांगली जिल्ह्यात 10 तर कोल्हापूर जिल्ह्यात 3 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे. सातारा जिल्ह्यातील 689 कोरोनाबाधित रुग्ण असून 419 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 241 असून एकूण 29 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 1 हजार 412 कोरोनाबाधित रुग्ण असून 798 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 486 आहे. कोरोनाबाधित एकूण 128 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील 186 कोरोनाबाधित रुग्ण असून 101 बाधित रुग्ण बरे होऊ घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 79 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 695 कोरोनाबाधित रुग्ण असून 571 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, अ‌ॅक्टिव्ह रुग्णसंख्या 116 असून एकूण 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत विभागामध्ये एकूण 1 लाख 7 हजार 803 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 1 लाख 4 हजार 280 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर, 3 हजार 503 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 90 हजार 428 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 13 हजार 625 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.