चेन्नई - ऑस्ट्रेलियाचे खेळाडूं त्यांच्या बिनधास्त अंदाज आणि गजबच्या लाईफस्टाईलसाठी ओळखले जातात. त्यापैकी एक म्हणजे मॅथ्यू हेडन. कधीकाळी एक स्फोटक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या क्रिकेटरला भारताविषयी खूपच प्रेम आहे.
हेडन कधी मंदिरात पूजा करताना तर कधी लुंगी घालून आणि नकली दाढी लावून चेन्नईच्या रस्त्यावर खरेदी करताना दिसून येतोय. काल तो चेन्नईच्या टी नगर स्ट्रीट मॉल जवळून दोनशे रुपायांचे घड्याळ बार्गेनिंग करून १८० रुपयात विकत घेतले. याचे फोटो हेडनने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
हेडन त्याला रस्त्यावर कुणी ओळखू नये यासाठी नकली दाढी लावून आणि लुंगी घालून स्वत:ची ओळख लपवून फिरत होता. खरेदीच्या वेळी स्थानिकांनी हेडनची मदतही केली. खरेदी करून झाल्यावर आपण बाजारात जाऊन घड्याळ घेतल्याचे सांगितले.
हेडने शेन वॉर्नसोबत १ हजार रुपायांपेक्षा कमी पैशात सामान खरेदी करण्याची पैज लावली होती. त्यातून तो लुंगी, शर्ट, रजनी ब्रांडचे उन्हाळी चष्मे आणि एक घड्याळ खरेदीसाठी बाजारात गेला होता.
यापूर्वी तो क्रिकेटच्या मैदानावर लुंगी आणि चेन्नईची जर्सी नेसून चौकार षटकार मारताना दिसून आला होता. तो आयपीएलच्या ३ सीजनमध्ये चेन्नई संघाकडून खेळला होता. त्यात ३४ डावात त्याने १ हजार ११७ धावा केल्या.