सातारा - कोयना धरण क्षेत्रात विभागात शनिवारी पावसाने पुर्णतः उघडीप दिली आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही कमालीने घटली आहे. सध्या प्रतिसेकंद सरासरी केवळ 756 क्युसेक्स इतकेच पाणी धरणात येत आहे. तर सिंचनासाठी पूर्वेकडे कोयना धरण पायथा वीजगृहातून सोडण्यात येणारे पाणीही शनिवारी बंद करण्यात आले आहे.
धरणात आता एकूण पाणीसाठा 33.75 टीएमसी पैकी असून उपयुक्त साठा 28.75 टीएमसी आहे. धरणातील पाण्याची उंची 2083.4 फूट तर जलपातळी 635 मीटर इतकी झाली आहे.1 जूनपासून 6 जूनपर्यंतचा कोयना 6 मिलीमीटर (253), नवजा 3 मिलीमीटर (212) व महाबळेश्वर येथे 1 मिलीमीटर (300) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून धरण पायथा वीजगृहातील दोन जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 2100 क्युसेक्स पाणी पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात येत होते. यापैकी शुक्रवारी एक जनित्र बंद करून केवळ एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 1050 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत होते. मात्र, शनिवारी हे एक जनित्रही बंद करण्यात आले आहे