लखनौ - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट मतदान होत आहे, असा आरोप अमरोहा येथील भाजपचे उमेदवार कंवर सिंग तंवर यांनी केला आहे. तंवर यांच्या आरोपानंतर खळबळ उडाली आहे.
बुरख्यामध्ये असणाऱ्या महिलांची तपासणी होत नाही. त्यांची ओळख पडताळून पाहिल्या जात नाही. मी ऐकले आहे की, बुरखा परिधान केलेल्या एका पुरुषालाही पकडण्यात आले आहे, असा आरोप तंवर यांनी केला आहे.
दरम्यान, आज होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी अनेक घटना घडल्या आहेत. ओडिशामध्ये एका महिला मतदान अधिकाऱ्याची माओवाद्यांकडून हत्या करण्यात आली आहे. तसेच मतदान अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनालाही नक्षल्यांनी आग लावली आहे.