हैदराबाद - या हंगामातील आयपीएलमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पाठीशी दुखापतीचे ग्रहण लागले आहे. सीझनच्या पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना दुखापत झाली होती. त्यानंतर काल शनिवारी हैदराबाद विरुद्ध खेळताना त्याच्या डोळ्याला पुन्हा दुखापत झाली. राजीव गांधी स्टेडियमवर सराव करताना त्याच्या उजव्या डोळ्याला दुखापत झाली.
त्यामुळे बुमराहच्या डोळ्याखाली काळी निशाणी दिसत आहे. सराव करताना ही दुखापत झाली आहे. अभ्यास करतानाचा चेंडू थोडा मऊ असतो. त्यामुळे त्याला छोटी दुखापत झाली आहे.
मुंबई इंडियन्सचा सदस्य असलेला बुमराह हा भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज आहे. वेगवान गोलंदाजीची बहुतांश मदार त्याच्या खांद्यावर आहे. विश्वचषकात त्याची भूमिका महत्वाची आहे. बुमराह हा डेथ ओव्हरचा स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून ओळखला जातो. यापूर्वी पहिल्या सामन्यात त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती.