मुंबई - इंग्लंडमध्ये ३० मेपासून होणाऱ्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघ २२ मे रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे. या स्पर्धेत १० संघ सहभागी होणार आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या विश्वकरंडकासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे.
भारताचा १५ सदस्यीय संघ मुंबईहून इंग्लंडला २२ मे ला सकाळी निघेल. दुखापत ग्रस्त केदार जाधवच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. तो लवकर फिट होईल अशी आशा, संघ व्यवस्थापकांना आहे. विश्वचषकात भारताची पहिली लढत दक्षिण आफ्रिकेशी ५ जूनला होणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघ २५ आणि २८ मे रोजी दोन सराव सामने खेळणार आहे.
केदार जाधवला आयपीएलमध्ये पंजाब विरुद्धच्या सामन्यात खांद्याला दुखापत झाली होती. थ्रो रोखण्यासाठी केदारने सूर मारल्याने त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला.
विश्वचषकासाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के.एल. राहुल, विजय शंकर, एम.एस. धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी.