बुलडाणा - तालुक्यातील रायपूर या गावात शंभर टक्के अनुदानीत असलेले, श्री शिवाजी विद्यालयातील शिक्षक गणेश बागूलराव देशमाने यांची नियुक्ती शिक्षणाधिकाऱ्यांनी अवैध ठरवली होती. माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी तसा निर्णय दिला होता. मात्र, उपसंचालक अमरावती यांना देशमाने यांची नियुक्ती रद्द करण्याची शिफारस १ वर्षे अगोदर पाठवली असतानाही, त्यांना कामावरून काढून टाकलेले नाही. याउलट हाच शिक्षक शाळेच्या मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळत आहे.
हेही वाचा... 'फ्री काश्मीर' फलकावरून महाराष्ट्रात वादंग, बॅनर झळकावणारी तरुणी म्हणते...
शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकाची नियुक्ती अवैध असल्याचे सांगितले. मात्र, ही शिफारस केल्यानंतर दुसरा कोणताही शिक्षक मुख्याध्यापक पदाचा कारभार स्विकारत नसल्याने, याच शिक्षकाला हे पद देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शासनाकडून नियमित वेतनही सुरू असल्याचे समोर येत आहे.
हेही वाचा... सरकारी बँकांची सेवा विस्कळित होण्याची शक्यता; उद्या कामगार संघटनांचा संप
अधिक माहिती घेतल्यानंतर हा शिक्षक शाळेच्या संस्था सचिवाचा जावई असल्याचे समोर आले. त्यामुळे यात अनेकांचे लागेबंध असण्याचीही शक्यता आहे. हा सर्व प्रकार या शाळेतील निलंबित शिक्षक नरेश मानकर यांनी समोर आणला आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी देशमाने याला अवैध ठरवले, तेव्हा मुख्याध्यापक पदावर असलेल्या नरेश मानकर यांनी देशमानेचे वेतन काढले नाही. त्यामुळे त्यांची सेवा समाप्ती करून त्यांना निलंबित केल्याचे मानकर यांनी सांगितले आहे. रायपूर येथे १३९ विद्यार्थी संख्या असलेली वर्ग ५ ते १० वी पर्यंत शंभर टक्के अनुदानीत असलेले हे श्री शिवाजी विद्यालय आहे.
हेही वाचा... ठाण्यात गॅस सिलेंडर स्फोट : जीवितहानी नाही; मात्र, अग्निशमन दलाला पोहोचण्यास अडथळा