ETV Bharat / briefs

उद्यापासून बोरिवलीतील भगवती रुग्णालयाचे आयसीयू विभाग होणार सुरू - Pravin Darekar Bhagwati hospital issue

भगवती रुग्णालयात 69 खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच आयसीयू विभागात 10 बेड व 5 वेंन्टिलेटर्सची सुविधा देण्यात येणार आहे. महापालिकेच्या अभियंता विभागाने योग्य कार्यवाही करून रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.

Bhagwati hospital icu matter
Bhagwati hospital icu matter
author img

By

Published : Jun 21, 2020, 9:11 PM IST

मुंबई - विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि दोनच दिवसांपूर्वी स्वत: भगवती रुग्णालयाला दिलेल्या भेटीनंतर प्रशासकीय यंत्रणांना जाग आली आहे. त्यामुळे सुमारे 2 वर्षापासून बंद असलेला रुग्णालयातील आयसीयू विभाग उद्या (सोमवार) पासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर व मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी दिलेल्या शब्दामुळे हा विभाग पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. यामुळे पश्चिम उपनगरातील गरजू रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

भगवती रुग्णालयात 69 खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच आयसीयू विभागात 10 बेड व 5 वेंन्टिलेटर्सची सुविधा देण्यात येणार आहे. महापालिकेच्या अभियंता विभागाने योग्य कार्यवाही करून रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. तसेच या विभागासाठी आवश्यक कर्मचारी वर्गाचीसुध्दा व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व सोपस्कर पूर्ण झाले असून सोमवारी औपचारिकपणे आयसीयू विभाग सुरू होईल.

विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी दोन दिवासंपूर्वी भगवती महानगरपालिका रुग्णालयाला भेट दिली. यावेळी दरेकर यांनी रुग्णालयातील ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, उपलब्ध खाटा, उपलब्ध औषधे व इंजेक्शन आदी आरोग्य यंत्रणांची माहिती घेऊन येथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. 2 वर्षांपासून सर्व साहित्य आणि यंत्र खरेदी करूनही येथील आयसीयू बेड विभाग सुरू झालेला नाही. एका बाजूला जनतेचा पैसा 2 वर्ष त्या मशीनवर खर्च केला त्याचे सोयरसुतक कोणालाही नाही. याबद्दल दरेकर यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले होते.

पालिका आयुक्त चहल यांच्याशी यासंदर्भात संपर्क करून हा विभाग सोमवार पासून सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार प्रशासकीय यंत्रणांनी युद्धपातळीवर काम सुरू केले असून उद्या हा विभाग सुरू होणार आहे. यामध्ये आणखी 10 बेड वाढविण्याची मागणीही दरेकर यांनी केली होती. त्यानुसार येथे बेडही वाढविण्यात येणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.