दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने श्रीलंकेचा माजी खेळाडू नुआन झोयसा आणि अविष्का गुणवर्धने यांना निलंबित केले आहे. संयुक्त अरब अमिरातच्या एक टी- १० लीगमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला. यापूर्वीच झोयसाला भ्रष्टाचारच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले आहे. दोघांनाही आयसीसीने उत्तर देण्यासाठी १४ दिवसांचा अवधी दिला आहे.
आयसीसीने अमिरात क्रिकेट बोर्डाकडून श्रीलंकेच्या माजी गोलंदाजी प्रशिक्षक झोयसावर ४ तर गुणवर्धनेवर २ आरोप लावण्यात आले आहे. आससीसीने त्यांच्यावर कोणत्या कारणासाठी कारवाई केली आहे, याचे कारण त्यांनी सांगितले नाही. त्यांच्यावरील आरोप मागील वर्षी डिसेंबरमध्ये संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळण्यात आलेल्या टी-१० क्रिकेट लीगशी संबंधीत आहे.