ETV Bharat / briefs

मी बाबरी मशिद पाडकामात सहभागी होते.. प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यावरुन नवे वादंग - babri

प्रज्ञा सिंह ठाकूर मध्यप्रदेशातील भोपाळ येथे बोलत होत्या. यावेळी राम मंदिर आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, की मी अयोध्येत गेले होते. मी हे नाकारत नाही. मी बाबरी पाडण्यात सहभाग घेतला.

प्रज्ञा सिंग
author img

By

Published : Apr 21, 2019, 12:14 PM IST

दिल्ली - मी बाबरी मशीद पाडायला गेले होते. राम मंदिर बांधण्याच्या आंदोलनात मी सहभाग घेतला होता. ते बनविण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. असे वक्तव्य मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी आणि भाजपच्या भोपाळ येथील उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले. यासंबंधी त्यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.

प्रज्ञा सिंह ठाकूर मध्यप्रदेशातील भोपाळ येथे बोलत होत्या. यावेळी राम मंदिर आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, की मी अयोध्येत गेले होते. मी हे नाकारत नाही. मी बाबरी पाडण्यात सहभाग घेतला. तसेच, मी राम मंदिर आंदोलनातही सहभागी झाले होते असे त्या म्हणाल्या. आम्हाला राम मंदिर बांधण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. राम हेच राष्ट्र आहे आणि राष्ट्र हेच राम आहे असे प्रज्ञा सिंह म्हणाल्या.

बाबरी मशीद पाडण्याच्या वक्तव्यावर निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. एका दिवसात यावर स्पष्टीकरण देण्यास त्यांना बजावण्यात आले आहे. यावर प्रज्ञा सिंग काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच प्रज्ञा सिंग यांनी हुतात्मा हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरुन बरेच वादंग माजले होते. आता त्यांच्या बाबरीवरील वक्तव्यावरुन नवीन वादाला तोंड फुटले आहे.

Intro:Body:

State News

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.