हैदराबाद - जगभरात 1 कोटीपेक्षा जास्त व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 5 लाख 40 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा संसर्गाने मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सर्वात जास्त धोका लहान बालके, गर्भवती महिला, वयोवृद्ध आणि आधीच व्याधींनी त्रस्त असलेल्यांना जास्त आहे. या लेखात आपण बालकांमधील कोरोनाची लक्षणे कशी ओळखायची ते पाहू.
बालकांमधील कोरोनाची लक्षणे ओळखून तत्काळ वैद्यकीय मदत देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे कोरोनावर मात करणे शक्य होते. याविषयी ईटीव्ही भारत सुखीभवच्या टीमने हैदराबादमधील रेनबो रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ विजयानंद जमालपूरी चर्चा केली.
बालकांमध्ये कोरोनाची लक्षणे किती सर्वसामान्य आहेत ?
किती बालकांना कोरोना झाला याची नक्की आकडेवारी समोर आली नाही. कारण, जगभरात कोरोनाचा जो अभ्यास झाला, त्यात कोरोनाची लक्षणे न दिसणाऱ्या बालकांची चाचणी घेण्यात आली नाही. मात्र, कोरोना नवजात बालक, किशोरवयीन मुलांपासून ते 18 वर्षापर्यंतच्या बालकांवर परिणाम करतो.
प्रौढांच्या तुलनेत बालकांना कोरोनाची लागण किती प्रमाणात होते?
इंग्लड, अमेरिका आणि चीन देशात केलेल्या अभ्यासातून असे समोर आले आहे की, एकूण कोरोना बाधितांपैकी 2 टक्के रुग्ण बालके आहेत. एकूण कोरोना बाधितांचा विचार करता ही संख्या कमी आहे. सुमारे 5 टक्के बालकांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. त्यांच्यातील संसर्गाची तीव्रता सामान्य ते मध्यम असते. मात्र, अती गंभीर नसते.
मागील 6 आठवड्यांपासून कोरोनाची लक्षणे आणि आजाराचे स्वरूप बदलत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे यास ' पेडियाट्रीक मल्टी सिस्टिम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम' असे बोलले जात आहे. यामध्ये रोग्याच्या अवयवांमध्ये सुज दिसून येते आणि त्याच्या शरिरावर परिणाम होतो. मात्र, बालकांमध्ये ही लक्षणे कमी आढळून येतात. या प्रकारची तीव्र लक्षणे हजारांतून 1 बालकात दिसू शकतात.
बालकांमध्ये कोरोनाची काणती लक्षणे आढळून येतात? त्यांना डॉक्टरांकडे कधी घेवून जावे?
डोकेदुखी, खोकला आणि ताप ही कोरोनाची सर्वसामान्य लक्षणे आहेत. डोकेदुखी बालकांमध्ये सहसा दिसून येत नाही. चारपैकी एका बालकात डोकेदुखीचे लक्षण दिसून येते. प्रौढांमधील घसा खवखवणे हे सामान्य लक्षण बालकांमध्ये दिसून येत नाही. खुपच लहान मुलांना खसा खवखवतोय हे पालकांना सांगताही येत नाही, ही मोठी समस्या आहे. त्यामुळे ते एकतर सतत रडत राहतात. काहीही खात नाहीत किंवा त्यांच्या तोंडातून लाळ गळत राहते.
कोरोनाचे आणखी एक कारण म्हणजे अंगदुखी. मोठी अंग दुखतयं, असे सांगू शकतात. मात्र, लहान बालके एका जाग्यावर बसून राहतात किंवा रडत बसतात. उलटी आणि अतिसार हे सुद्धा कोरोनाचे लक्षण लहान बालकांमध्ये आढळून येते.
श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे लक्षण लहान मुलांमध्ये सर्वसामान्यपणे दिसत नाही. त्याऐवजी त्याची हालचाली कमी होते. चालणे, फिरणे या क्रिया करण्यास बालक विरोध करते. आपल्या मुलामध्ये यापैकी कोणती लक्षणे दिसत असतील तर तत्काळ वैद्यकीय मदत द्यावी.