ETV Bharat / briefs

आरोग्य विम्याचे सलग आठ वर्ष हफ्ते भरल्यानंतर कंपनी दाव्याला आवाहन देऊ शकत नाही - IRDAI

विमा धारकाने हप्ते भरलेले नसतील किंवा काही फसवणूक केली असेल तरच विमा पॉलिसीला आवाहन देता येणार आहे, अन्यथा पॉलिसीला आवाहन देता येणार नाही, असे विमा प्राधिकरणाने स्पष्ट केले.

आरोग्य विमा
आरोग्य विमा
author img

By

Published : Jun 14, 2020, 4:58 PM IST

नवी दिल्ली - सलग आठ वर्ष आरोग्य विम्याचे हप्ते भरल्यानंतर आरोग्य विमा कंपन्यांना दाव्याला आवाहन देता येणर नाही, असे विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने आपल्या नव्या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे. आरोग्य विम्यातील तरतुदी आणि कलमांना प्रमाणित करण्यासाठी नवी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत.

या मार्गदर्शक तत्वांमधून अपघात आणि देशांतर्गत/परदेश प्रवास विमा प्रकरणे वगळण्यात आली आहेत. याआधी काढण्यात आलेल्या विमा पॉलिसींचे जेव्हा नुतनिकरण होईल तेव्हा त्यांना नवी मार्गदर्शक तत्वे लागू होतील, असे विमा प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

विमा धारकाने आठ वर्ष सलग हप्ते भरल्यानंतर कंपनीला त्याच्या पॉलिसीमध्ये काहीही बदल करता येणार नाही. जर विमा धारकाने हप्ते भरलेले नसतील किंवा काही फसवणुक केली असेल तरच विमा पॉलिसीला आवाहन देता येणार आहे, अन्यथा पॉलिसीला आवाहन देता येणार नाही, असे विमा प्राधिकरणाने स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.