मुंबई - आयपीएलच्या १२ व्या हंगामात काही विवाद समोर येत आहेत. पहिल्यांदा अश्विन आणि बटलर यांच्यात झालेला मंकड विवाद आणि आता जिंग बेल्सवर बाद होण्याची शक्यता आहे. या वादाची सुरुवात केकेआर आणि राजस्थान यांच्या सामन्यात झाली. जेव्हा कोलकाताचा आक्रमक फलंदाज ख्रिस लिन याला स्टंम्पला चेंडू लागले तरीही बेल्स न पडल्याने बाद दिले गेले नाही.
मुंबई आणि पंजाब यांच्यात काल झालेल्या सामन्यात अशीच घटना घडली. मुंबईच्या १३ व्या षटकात अष्टपैलू हार्दिक पंड्या याला पंजाबचा गोलंदाज हार्डस विलोजेन गोलंदाजी करत होता. त्यावेळी चेंडू स्टंम्पला लागून तो सीमापार गेला. पंचानी तो चेंडू वाईड दिला. बेल्स खाली न पडल्याने पंड्याला बाद दिले गेले नाही. तसेच मुंबईला अतिरिक्त ५ धावा मिळाल्या. याच धावा पंजाबला खूपच महागात पडल्या.
पंड्या खेळत असताना चेंडू स्टंम्पला लागला पण त्याचे बेल्स न पडल्याने त्याला बाद दिले गेले नाही. त्यामुळे पंजाबचे खेळाडू आश्चर्य व्यक्त करत होते. जिंग बेल्स यंदाच्या आयपीएलमध्ये नवा वादाचा विषय ठरु शकतो.