ETV Bharat / briefs

जिल्ह्यात 30 जूनपर्यंत 'लॉकडाऊन', प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी

जिल्ह्यात 30 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून या सूचना 30 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत अंमलात राहतील.

जिल्हाधिकारी एम. डी. सिंह
जिल्हाधिकारी एम. डी. सिंह
author img

By

Published : Jun 2, 2020, 10:10 AM IST

यवतमाळ - जिल्ह्यात 30 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून या सूचना 30 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत अंमलात राहतील.

30 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत सुधारित मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे

  • संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक, प्रशिक्षण, संस्था व शिकवणी वर्ग, हॉटेल, रेस्टॉरेंट आणि इतर आदरतिथ्याची सेवा पूर्णपणे बंद राहतील.
  • रेस्टॉरेंटला अन्नपदार्थ घरपोच देण्याची मुभा राहील.
  • सर्व सलून, स्पा, ब्युटीपार्लर, सर्व आठवडी बाजार, सर्व ढाबे, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची दुकाने, चहाकॉफी सेंटर, पानठेला व शितपेयाची दुकाने बंद राहतील.
  • कपड्याच्या दुकानामधील ट्रायल रुम बंद तसेच विकलेले कपडे बदलवून देण्याचे धोरण अवलंबू नये.
  • सर्व सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक राहील. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी एकमेकांमध्ये कमीत कमी 6 फुट अंतर ठेवणे आवश्यक आहे. (सामाजिक अंतर) दुकानामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्ती असणार नाहीत, ह्याची दक्षता दुकान मालकाने घ्यावी.
  • लग्न समारंभाच्या कार्यक्रमास वेगळ्या परवानगीची आवश्यकता असणार नाही. परंतु, लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार नाही. अंत्यविधीप्रसंगी 20 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणार नाही.
  • आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक वयोगट असणारे 65 वर्षाचे वरील जेष्ठ नागरिक, अनेक व्याधी असणाऱ्या व्यक्ती, गरोदर माता, 10 वर्षाखालील मुले यांना टाळेबंदी (Lockdown) काळात अत्यावश्यक कामाच्या, आरोग्याच्या कारणाचे अपवाद वगळता घराबाहेर पडता येणार नाही.

सर्व सार्वजनिक आणि खासगी वाहतुकीस सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत खालीलप्रमाणे मुभा राहील.

  • दुचाकी – 1 व्यक्ती (चालक), तीनचाकी (रिक्षा) 1+2 व्यक्ती, चारचाकी (टॅक्सी, कॅब) 1+2 व्यक्ती व्यक्ती. जिल्ह्यांतर्गत वाहतुकीसाठी वेगळ्या वाहन पासची आवश्यकता असणार नाही.
  • यवतमाळ जिल्ह्यांतर्गत सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत बससेवा जास्तीत जास्त 50 टक्के क्षमतेनुसार सुरू करण्यास मुभा देण्यात येत आहे. परंतु, सामाजिक अंतर व स्वच्छतेची उपाययोजना करणे आवश्यक राहील.
  • सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत सर्व दुकाने, बाजारपेठ सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु दुकाने, बाजारपेठ येथे गर्दी वाढल्यास किंवा सामाजिक अंतराचे पालन करण्यात येत नसल्याचे दिसून आल्यास बाजारपेठ व दुकाने बंद करण्याबाबतचे आदेश काढण्यात येतील.
  • औषधी दुकाने (मेडीकल), दवाखाने, पशुवैद्यकीय चिकित्सालये व औषध दुकाने 24 तास सुरू राहतील.
  • सकाळी 7 ते सायंकाळी 7 या कालावधीत उद्योग (शहरी व ग्रामीण) सुरु राहतील. खासगी आस्थापने सुरु राहतील. त्यांचे कार्यालयीन वेळेनुसार म्हणजे सकाळी 9 ते सांयकाळी 5 या वेळेत राहील. शासकीय कार्यालयीन वेळेनुसार सर्व शासकीय कार्यालये 100 टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील.
  • वैद्यकीय आपातकालीन सेवेची वाहतूक सुरू राहील. सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खाद्यगृहामधून तयार खाद्यपदार्थांची घरपोच सेवा सुरू राहील.
  • इलेक्ट्रिशियन्स, प्लंबर इत्यादी तसेच गॅरेज, वर्कशॉप इत्यादी सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

वरील सर्व आस्थापने/प्रतिष्ठाने/सेवा व इतर सर्व बाबींसाठी वेगळ्या परवानगीची अथवा पासेसची आवश्यकता असणार नाही. परंतु, वर दिलेल्या वेळेतच सर्व सुरू राहतील आणि दिलेल्या वेळेनुसारच बंद होतील, याची नोंद घ्यावी, असे प्रशासनाने कळवले आहे.

हे आदेश यवतमाळ जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळता उर्वरित ग्रामीण व शहरी क्षेत्रास लागू राहतील. यवतमाळ जिल्ह्यात रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत आहे. या कालावधीत कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये. या वेळेत विनाकारण फिरताना आढळल्यास अशा व्यक्तींच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.