गडचिरोली - जिल्हा पोलीस एकीकडे नक्षली कारवायांवर आणण्यासोबतच दुसरीकडे वाढत्या कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठीही आपली भूमिका पार पाडत आहेत. आता रस्त्यावर येऊन ते आपले कर्तव्य बजावत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज भामरागड चौकात एक महिला पोलीस अधिकारी कर्तव्य बजावत समुपदेशन करत होत्या.
कोरोनाचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे. अगोदर पहिल्या लाटात खेड्यात खूपच कमी रुग्ण सापडले होते. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता पाहायला मिळत होती. मात्र, आता खेड्यातही मोठ्या प्रमाणात रुग्ण्संख्या आढळत आहेत. जिल्ह्यातही ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.
विनाकारण फिरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी जागोजागी तपासनाके उभारण्यात आले आहेत. रुग्ण वाढत असल्यामुळे एकीकडे नक्षली तर दुसरीकडे कोरोना दुहेरी भूमिका निभावताना गडचिरोली जिल्ह्यासह दक्षिण गडचिरोली भागातील अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, चामोर्शी, पोलीस यंत्रणा सतर्क झाले आहे.
आज भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, ठाणेदार किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप. नि संगमित्र बांबोडे यांनी भामरागड मुख्या चौकावर बाहेरून येणाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांचे समुपदेशन केले.