ETV Bharat / briefs

डोंबिवलीत कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन मोफत - Dr. Shrikant shinde foundation thane

कोरोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी अनेक राज्यांनी आपापल्या परीने निर्बंध लागू केले आहेत. काही राज्यांमध्ये लॉकडाऊनदेखील लागू करण्यात आले आहे.

Oxygen constratar
ऑक्सिजन कॉन्सट्रेटर डोंबिवली
author img

By

Published : May 8, 2021, 5:55 PM IST

ठाणे - संपूर्ण जगभरासह महाराष्ट्रात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. याचा आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. कोरोना रुग्णांसाठी आवश्यक, ऑक्सिजन पुरवठा, औषधे आणि हॉस्पिटलमधील बेड यांचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारकडून विविध पावले उचलण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना बाधित रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन बँक योजना सुरू करण्यात आली आहे.

रुग्णास ऑक्सिजनची गरज

कोरोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी अनेक राज्यांनी आपापल्या परीने निर्बंध लागू केले आहेत. काही राज्यांमध्ये लॉकडाऊनदेखील लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने देखील राज्यात लॉकडाऊन लागू केले आहे. नागरिकांनी कोरोना संसर्गाच्या बाबतीत खबरदारी घ्यावी यासाठीच्या सूचना सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येत आहेत. विविध पातळीवर जनजागृती करण्यात येते आहे. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील बहुतांश महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच रुग्णास ऑक्सिजनची गरज भासल्यास किंवा संवेदनशील परिस्थितीत रुग्णास जिल्ह्याअंतर्गत अथवा जिल्हाबाह्य रुग्णालयात घेऊन जात असताना, ऑक्सिजन अभावी रुग्ण वाटेतच दगावले असल्याची घटना देखील घडत असते. त्याचअनुषगाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून उपचारासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची तसेच ऑक्सिजन खाटांची उपलब्धता कमी पडत आहे.

मोफत ऑक्सिजन बँक योजना सुरू

रुग्णांना रुग्णालयात दाखल होईपर्यंत लागणाऱ्या कालावधीत रुग्णांची ऑक्सिजनची पातळी योग्य प्रमाणात रहावी, या दृष्टीकोनातून डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना बाधित रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन बँक योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ कल्याण, डोंबिवली व इतर शहरांतील कोरोना बाधित रुग्णांना घेता येणार आहे. या योजनेद्वारे कोरोनामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेल्या रुग्णांना घरच्या घरी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. यावेळी जिल्हाप्रमुख गोपळ लांडगे, उपजिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख मंगेश चिवटे, शहरप्रमुख राजेश मोरे, तात्या माने, राजेश कदम, सागर जेधे, संजय पावशे, एकनाथ पाटील, राहुल म्हात्रे उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.