ETV Bharat / briefs

'रॅपिड अँटीबॉडीज टेस्ट किट'चा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना - Dr. Sudhakar since rapid antibody test study

राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष असून ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, प्रा. डॉ. अमिता जोशी हे सदस्य असून आरोग्य संचालक समितीचे सदस्य सचिव आहेत.

Maharashtra government
Maharashtra government
author img

By

Published : Jul 12, 2020, 8:54 PM IST

मुंबई- कोरोनाचा प्रसार सुरू असतानाच भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने कोरोना निदानासाठी शिफारस केलेल्या विविध रॅपिड अँटीबॉडीज चाचणी प्रणाली किंवा किटचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत चार सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. विविध कंपन्यांनी उत्पादित केलेल्या किटचा अभ्यास करून समितीला दहा दिवसात शासनाला अहवाल सादर करावा लागणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष असून ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, प्रा. डॉ. अमिता जोशी हे सदस्य असून आरोग्य संचालक समितीचे सदस्य सचिव आहेत. यासंदर्भात काल आरोग्य विभागामार्फत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

समितीचे कार्य असे राहील-

• आयसीएमआरने रॅपिड अँटीबॉडीज चाचण्यांसाठी शिफारस केलेल्या विविध चाचणी प्रणाली, किट यांचा अभ्यास करून त्यापैकी सर्वच अथवा निवडक चाचणी प्रणालीचा आणि किटचा राज्यात वापर करण्याची शिफारस करणे.

• या चाचण्या पोलीस, आरोग्य सेवेशी निगडीत संवर्ग, स्वच्छता कामगार, तसेच सामान्य जनता यांच्यावर करायच्या की, निवडक संवर्गावर करायच्या याबाबत शिफारस करणे.

• शिफारस केलेल्या चाचण्या व किटच्या बाबतीत अभिव्यक्ती स्वारस्य (EOI) मसुदा तयार करून तो आरोग्य विभागाला सादर करायचा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.