रत्नागिरी- भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली आहे. यात माजी खासदार निलेश राणे यांचीही निवड करण्यात आली आहे.
कार्यकारिणीत शोभाताई फडणवीस, सुरेश हावरे, मुकुंदराव कुलकर्णी, रघुनाथ कुलकर्णी, सुधाकर देशमुख, डॉ. सुनिल देशमूख, माजी आमदार मधू चव्हाण यांचाही समावेश आहे. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ती योग्य पद्धतीने निभावून पक्ष वाढीसाठी नेहमीच प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी यावेळी दिली आहे.