नवी दिल्ली - आयपीलएलच्या १२ व्या मौसमात कोणत्याही फ्रँचाईजीने मनोज तिवारीला खरेदी करण्यास स्वारस्य दाखविले नाही. त्यामुळे मनोज तिवारीने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. पण मनोजला पुन्हा आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. नुकतेच मनोजने दिल्ली संघाकडून सुरू असलेल्या इमरजेंसी ट्रायलमध्ये भाग घेतला आहे.
-
Wondering wat went wrong on my part after getting Man of a match award wen I scored a hundred 4 my country and got dropped for the next 14 games on a trot ?? Looking at d awards which I received during 2017 IPL season, wondering wat went wrong ??? pic.twitter.com/GNInUe0K3l
— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) December 18, 2018 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Wondering wat went wrong on my part after getting Man of a match award wen I scored a hundred 4 my country and got dropped for the next 14 games on a trot ?? Looking at d awards which I received during 2017 IPL season, wondering wat went wrong ??? pic.twitter.com/GNInUe0K3l
— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) December 18, 2018Wondering wat went wrong on my part after getting Man of a match award wen I scored a hundred 4 my country and got dropped for the next 14 games on a trot ?? Looking at d awards which I received during 2017 IPL season, wondering wat went wrong ??? pic.twitter.com/GNInUe0K3l
— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) December 18, 2018
काही दिवसांपूर्वी दिल्लीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागेवर नव्या खेळाडूला संधी देण्यासाठी दिल्लीने इमरजेंसी ट्रायलचे आयोजन केले होते. कोलकात्याकडून खेळणाऱ्या मनोज तिवारीने या ट्रायलमध्ये भाग घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. मनोज सोबत मुंबईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे, पंजाबचा मनप्रीत सिंह गोनी, कर्नाटकचा फिरकी गोलंदाज जगदीश सुचित हे सहभागी झाले आहेत.
दिल्लीचा सल्लागार सौरव गांगुलीने म्हणाला, की तिवारी हैदराबादला दिल्ली संघासोबत जाणार आहे. गांगुली पुढे म्हणाला, की अजून एक फायनल ट्रयल होणार आहे आणि त्याच्यानंतरच अधिकृत घोषणा होणार आहे. ३३ वर्षीय मनोज तिवारी भारतीय संघाकडून १२ सामन्यात खेळला आहे. ज्यात १ शतक आणि १ अर्धशतक ठोकत २८७ धावा केल्या. तसेच ३ टी-२० सामन्यात त्याने १ डाव खेळून १५ धावा केल्या आहेत.
आयपीएलच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास त्याने ९८ सामन्यात १६९५ धावा केल्या आहेत. ज्यात ७ अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये मनोज कोलकाता, पुणे, दिल्ली आणि पंजाबच्या संघाकडून प्रतिनिधीत्व केला आहे.