पुणे - आषाढी वारी सोहळा दोन दिवसांवर आला असून शासनाकडून वारी सोहळ्याबाबत अद्यापही कुठलीच सूचना व परवानगी दिली गेलेली नाही. त्यातच आज आळंदीत कोरोनाचा पहिला बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आषाढी वारी सोहळ्याच्या तयारीला ब्रेक लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
आळंदीत कोरोनाचा पहिला बळी, दोन दिवसांवर आलेल्या आषाढी वारी सोहळ्याबाबत अनिश्चितता - संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा
कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊलींचा पायी पालखी सोहळा रद्द करून मोजक्याच वारकऱ्यांसमवेत माऊलींच्या पादुका बस किंवा हेलिकॉप्टरने दशमीच्या दिवशी पंढरपूरला जाणार आहेत. मात्र, या पालखी सोहळ्याबाबत अद्यापही प्रशासनाकडून कुठल्याच सूचना देण्यात आलेल्या नाहीत.
आळंदी कोरोना न्यूज