ETV Bharat / briefs

उत्तेजक द्रव्याचे सेवन करणाऱ्या खेळाडूला विश्वचषकाच्या संघातून काढले बाहेर - ECB Withdraws Alex Hales Name From World Cup Squad 2019 Earlier Banned For 21 Days

अॅलेक्स हेल्सच्या चुकीच्या वागण्यावर माजी कर्णधार मायकल वॉन याने ट्विट करून नाराजी व्यक्त करत त्याला संघाबाहेर काढण्याची मागणी केली होती.

अलेक्स हेल्स
author img

By

Published : Apr 29, 2019, 4:58 PM IST

लंडन - आयसीसी विश्वचषक स्पर्धेला ३० मेपासून सुरूवात होत आहे. यासाठी सर्वच संघांची घोषणा झाली आहे. मात्र यातच इंग्लंड संघाची डोकेदुखी वाढतच चालली आहे. सध्या इंग्लंडच्या खेळाडूंना दुखापतीने घेरले आहे. असे असतानाच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे. इंग्लंडच्या विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या संघातून अलेक्स हेल्सचे नाव वगळण्यात आले आहे.

आयर्लंड आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध होणाऱया मालिकेतूनही त्याचे नाव काढून टाकण्यात आले आहे. उत्तेजक द्रव्याचे सेवन केल्याप्रकरणी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर या आधीच २१ दिवसांची बंदी घातली होती. त्यानंतर पुन्हा आता क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेत त्याची विश्वचषकाच्या संघातून हाकलपट्टी केली.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याची माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटवर दिली आहे. बोर्डाच्या मते, अॅलेक्स हेस यांच्या बाबतीत घेण्यात आलेला निर्णय संघाच्या हितासाठी घेतलेला आहे. ड्रेसिंग रुममधील वातावरण चांगले राहण्यासाठी मदत होईल.

अॅलेक्स हेल्सच्या चुकीच्या वागण्यावर माजी कर्णधार मायकल वॉन याने ट्विट करून नाराजी व्यक्त करत त्याला संघाबाहेर काढण्याची मागणी केली होती.

अॅलेक्स हेल्स हा इंग्लंडच्या संघातील सलामीचा फलंदाज आहे. आक्रमक सुरूवात करून देणे ही त्याची खासीयत आहे. त्याने इंग्लंडकडून ७० सामन्यांत प्रतिनिधीत्व केले असून ३७.७९ च्या सरासरीने २ हजार ४१९ धावा केल्या आहेत. त्याचे संघातून बाहेर पडणे इंग्लंडसाठी नुकसानकारक असल्याचे बोलले जात आहे.

Intro:Body:

Sports NEWS 01

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.