ETV Bharat / briefs

कोरोनामुळे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हापरिषदांची रणधुमाळी लांबणीवर - Elections postpones in Maharashtra due to corona

कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद, नवी मुंबई, कोल्हापूर आणि वसई - विरार या पाच महानगर पालिकांची मुदत गेल्यावर्षी संपली. दरम्यान, कोरोनाचा शिरकाव झाल्याने निवडणुका पुढे ढकलल्या.

State election commission
राज्य निवडणूक आयोग
author img

By

Published : Apr 28, 2021, 12:13 PM IST

मुंबई - राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका १५ एप्रिलपर्यंत पार पाडण्याची योजना निवडणूक आयोगाने आखली होती. नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लावण्याबाबतचे धोरण ठरवले होते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यापर्यंत कोरोना आटोक्यात न आल्यास आगामी सर्वच निवडणुकांची रणधुमाळी लांबणीवर जाईल, अशी सुत्रांची माहिती आहे.

मुदत संपलेल्या महानगर पालिकांत प्रशासकीय राजवट -

कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद, नवी मुंबई, कोल्हापूर आणि वसई - विरार या पाच महानगर पालिकांची मुदत गेल्यावर्षी संपली. दरम्यान, कोरोनाचा शिरकाव झाल्याने निवडणुका पुढे ढकलल्या. मुदत संपलेल्या या पाच अर्थसंकल्पीय महानगरपालिकामध्ये प्रशासकाची राजवट लागू केली. मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थावर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांना कितीही काळ या पदावर ठेवण्याची तरतूद असलेला कायदा गेल्या महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आला आहे. आता शेकडो नगरपालिका व नगर तरतूद पंचायती तसेच सहा जिल्हा परिषदांची मुदत संपुष्टात आली आहे. डिसेंबरमध्ये कोरोनाचे संकट कमी झाल्यावर राज्य निवडणूक आयोगाने रखडलेल्या निवडणुका घेण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली. जानेवारी महिन्यात राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार या पडल्या.

परिस्थिती सुधारल्यास निवडणुका अन्यथा लांबणीवर -

मुदत संपलेल्या महापालिका परिषदांमध्ये प्रभाग निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती. मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्रभाग रचना जाहीर करून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येणार होत्या. कोरोनामुळे यंदा इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिलच्या अखेरीस सुरू होणार होत्या.

तत्पूर्वी १५ एप्रिलपर्यंत या निवडणुका पार पाडण्याची राज्य निवडणूक आयोगाची योजना होती. मात्र, कोरोनाचे संसर्ग आणि संक्रमण पुन्हा वाढू लागले. यावर प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. लसीकरण मोहीम देखील युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात परिस्थिती सुधारल्यास मुदत संपणाऱ्या शेकडो महानगर पालिकांसह आगामी सर्व निवडणुका एकत्रित पार पाडण्याची शक्यता आहे. अन्यथा निवडणूक आयोग सर्व निवडणुका लांबणीवर जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुदत संपलेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद -

महानगरपालिका -
कल्याण-डोंबिवली
वसई-विरार
नवी मुंबई
कोल्हापूर
औरंगाबाद

जिल्हा परिषद -
नागपूर
नंदुरबार
धुळे
वाशिम
अकोला
पालघर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.