ETV Bharat / briefs

आत्याला विधवा महिलेचे रूढी-पालन करण्‍यास भाग पाडल्‍याचे पाहून हताश होतात ‘भीमराव’!

author img

By

Published : Apr 30, 2021, 10:38 AM IST

भीमरावांचे जीवन एका विलक्षण टप्‍प्‍यावर येऊन ठेपले आहे, जेथे त्‍यांना चोहोबाजूंनी त्रास दिला जात आहे. सर्वज्ञ महाराज याच्‍या कटकारस्थानांमुळे भीमच्‍या समुदायांमध्‍ये दुफळी निर्माण होते.

Ek mahanayak Dr. B. R. Ambedkar
एक महानायक डॉ. बी आर आंबेडकर मालिका

मुंबई - भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित अँड टीव्‍हीवर 'एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेच्या आगामी एपिसोडमध्‍ये भीमरावांनी कोणकोणत्या दिव्यातून जावे लागतेय हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

भीमरावांचे जीवन एका विलक्षण टप्‍प्‍यावर येऊन ठेपले आहे, जेथे त्‍यांना चोहोबाजूंनी त्रास दिला जात आहे. सर्वज्ञ महाराज याच्‍या कटकारस्थानांमुळे भीमच्‍या समुदायांमध्‍ये दुफळी निर्माण होते. भीमराव व बाला यांच्यातीलही दारी वाढत जाते. बाला आपल्‍या बाजूने नसल्‍यामुळे त्‍यांना खूप दु:ख होते.

तसेच त्‍यांच्या आत्याला विधवा महिलेचे रूढी-पालन करण्‍यास भाग पाडल्‍याचे पाहून ते असहाय्य होतात. यामधून क्रांतीचा उगम होतो आणि परिस्थिती हाताबाहेर जाते. अशा परिस्थितीत भीमराव कशाप्रकारे या प्रसंगांचा सामना करतील हे मालिकेतून अनुभवयास मिळेल. समाज व कौटुंबिक समस्‍यांमध्‍ये अडकलेले भीमराव कोणता मार्ग निवडतात, हे बघणे प्रेक्षकांसाठी शिकवणी असेल.

विद्यमान एपिसोडबाबत सांगताना रामजी सकपाळची भूमिका साकारणारे जगन्‍नाथ निवंगुणे म्‍हणाले, ''भीमराव सर्वात अनपेक्षित स्थितीमध्‍ये अडकल्‍यानंतर असुरक्षित व चिंताग्रस्‍त दिसेल. आपल्‍या अवतीभोवती असलेल्‍या समस्‍यांसाठी उपाय शोधण्‍यामध्‍ये असमर्थ ठरल्‍यामुळे तो निराश होतो. भीमला त्‍याचा समाज व त्‍याच्‍या कुटुंबापासून दूर करण्‍यामध्‍ये यावेळी महाराज यशस्‍वी होईल का हे पुढील भागांतून समोर येईल.”

'एक महानायक डॉ. बी. आर. आम्‍बेडकर' ही मालिका दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता अँड टीव्‍हीवर प्रसारित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.