ETV Bharat / briefs

सातारा : कोरोनामुळे बंद असलेले आठवडी बाजार पुन्हा सुरू करण्याची मागणी - satara economic news

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन काळात सर्वच व्यवहार बंद झाले होते. त्याची झळ आता ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बसू लागली आहे. व्यवहार ठप्प झाल्याने शहराबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चाकेही रुतली आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्था प्रामुख्याने गावातील बाजरपेठेवर अवलंबुन असते. आठवडे बाजारामुळे दर आठवड्याला लाखो रुपयांची उलाढाल या बाजारात होत असते.

satara corona news
satara corona news
author img

By

Published : Jun 16, 2020, 4:17 PM IST

सातारा - कोरोना विषाणूच्या प्राद्रभावामुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. दोन महिन्यांनंतर लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. असे असले तरी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेले आठवडे बाजार अजूनही बंदच आहेत. त्यामुळे छोटेमोठे व्यावसायिक, तरकारी व्यावसायिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यांना आता पोटासाठी वणवण करावी लागत आहे. यात साहित्य, भाजीपाला खरेदी व विक्रीचा आर्थिक ताळेबंद लागत नाही. यासाठी नियमांचे पालन करून आठवडे बाजार सुरू करण्याची आमची तयारी असून शासनाने आठवडे बाजार सुरू करावेत, अशी मागणी केली जात आहे.

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन काळात सर्वच व्यवहार बंद झाले होते. त्याची झळ आता ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बसू लागली आहे. व्यवहार ठप्प झाल्याने शहराबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चाकेही रुतली आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्था प्रामुख्याने गावातील बाजरपेठेवर अवलंबुन असते. आठवडे बाजारामुळे दर आठवड्याला लाखो रुपयांची उलाढाल या बाजारात होत असते. जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी तसेच मोठ्या गावात रोजच मंडई भरते. आठवडे बाजारात स्थानिक व्यवसायिकांसोबतच अन्य ठिकाणचे छोटे मोठे व्यवसायिक आपली दुकाने लावतात. भाजीपाला, फळे, धान्य, चप्पल, शालेय साहित्य, खेळणी यांची खरेदी विक्री या बाजारात होत असते. परंतू गेल्या अडीच तीन महिन्यांपासुन आठवडे बाजार बंद आहेत. कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव वाढु नये म्हणून लॉकडाऊन असल्याने आणि वरचेवर तो वाढतच असल्याने छोट्या व्यावसायिकाची मात्र पंचायत झाली आहे.

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणार्‍या व्यावसायिकांचे हाल सुरु आहेत. त्यामुळे या छोट्या व्यवसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. हे आणखी किती दिवस चालणार हे मात्र कोणीच सांगु शकत नसल्याने छोट्या छोट्या व्यावसायिकांच्या अडचणीच भर पडली आहे. सध्या लॉकडाऊन मध्ये थोडी शिथिलता दिल्याने शहरी भागातील व्यवसाय जवळजवळ सुरु झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आठवडे बाजार सुरु करण्याची मागणी शेतकरी आणि व्यवसायिक वर्गाकडुन होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.