ETV Bharat / briefs

जेव्हा सौरव गांगुली होतो फिटनेस 'इंस्ट्रक्टर'

दिल्ली कॅपिटल्सने दोघांचा व्यायाम करतानाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

गांगुली आणि कैफ व्यायाम करताना
author img

By

Published : Apr 17, 2019, 11:59 PM IST

नवी दिल्ली - आयपीएलमध्ये या वर्षाच्या मौसमात दिल्ली कॅपीटल्स संघाने दमदार प्रदर्शन केले. सध्या दिल्लीचा संघ गुणतालिकेत ८ पैकी ५ सामने जिंकत चेन्नईनंतर दुसऱया स्थानावर आहे. रविवारी हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्लीने शानदार विजय मिळविला. विजयानंतर संघ जल्लोषात दंग होता तर दुसरीकडे संघाचा सल्लागार सौरव गांगुली आणि मोहम्मद कैफ जीममध्ये वर्कआउट करण्यात व्यस्त होते.

दिल्ली कॅपिटल्सने दोघांचा व्यायाम करतानाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले की, १० पैकी ९ वेळ आपल्याला वाटते की दिवसाची सुरुवात दादा सारख्या प्रशिक्षकासोबत व्हावी.

मोहम्मद कैफनेही हा व्हिडिओ त्याच्या ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत कैफने दादाचे कौतिक केले आहे. सौरव आणि कैफ या दोघांनीही बरेच दिवस भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. कैफने २००३ साली नॅटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात ३२६ धावांचा पाठलाग करताना नाबाद ८३ धावांची अविस्मरणीय खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता.

यापूर्वीच्या आयपीएलमध्ये दिल्लीने प्रत्येकवेळी निराशाजनक कामगिरी केली होती. प्रत्येकी वेळी हा संघ गुणतालिकेत सर्वात खालच्या क्रमांकावर असायचा. यंदा मात्र या संघाने दमदार कामगिरी केली आहे.

Intro:Body:

SPO 9

Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.