नागपूर - नागपूरच्या माझी मेट्रो प्रोजेक्टमध्ये तब्बल ७८१ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप जय जवान, जय किसान संघटनेने अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला आहे. टेंडरच्या स्वीकृत किमतीनंतर सुधारित किमतीनुसार कोणतेही टेंडर प्रक्रिया न राबवता शेकडो कोटी रुपयांचे ठेके नियमबाह्य पद्धतीने वाट्ल्याचा आरोप प्रशांत पवार यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गृह शहरातील मेट्रो प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत असल्याचे प्रकरणाला गांभीर्य प्राप्त झाले आहे.
नागपुरातील माझी मेट्रोला भ्रष्टाचारची कीड - प्रशांत पवार यांचा आरोप
नागपूर मेट्रो प्रकल्पाला भ्रष्ट्राचाराच्या आरोपाची किनार लागली आहे. माझी मेट्रो प्रोजेक्ट मध्ये ७८१ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप जय जवान जय किसान संघटनेने अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला आहे.
नागपूर - नागपूरच्या माझी मेट्रो प्रोजेक्टमध्ये तब्बल ७८१ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप जय जवान, जय किसान संघटनेने अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला आहे. टेंडरच्या स्वीकृत किमतीनंतर सुधारित किमतीनुसार कोणतेही टेंडर प्रक्रिया न राबवता शेकडो कोटी रुपयांचे ठेके नियमबाह्य पद्धतीने वाट्ल्याचा आरोप प्रशांत पवार यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गृह शहरातील मेट्रो प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत असल्याचे प्रकरणाला गांभीर्य प्राप्त झाले आहे.
Body:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष योगदान असलेल्या नागपूर मेट्रो प्रकल्पाला भ्रष्ट्राचाराच्या आरोपाची किनार लागली आहे.... नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्याची किंमत ८५०० कोटी रुपाये इतकी होती..... पहिल्या टप्यातील बहुतांश काम देखील आटोपले असताना आता दुसऱ्या टप्यातील ( विस्तारित ) कामाचा डीपीआर तयार झाला असून तो केंद्राच्या मंजुरी करिता नगर विकास मंत्रालयाकडे पाठवण्यात आले आहे....पहिल्या टप्यातील एलिव्हेटेड ट्रकचे काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रो स्टेशन तयार करण्याकरिता निविदा मागवण्यात आल्या होत्या.... त्यापैकी रिच-३ ( सीताबर्डी ते लोकमान्य नगर ) मार्गावरील १० मेट्रो स्टेशन बांधण्यासाठी महामेट्रोने निविदा मागवल्या होत्या.... त्या काकाराची किंमत ४४५.७५ कोटी रुपये निर्धारित करण्यात आली असताना आयटीडी नावाच्या कंपनीने तो टेंडर २३७.८८ कोटी रुपयांना मिळवला..... त्यानंतर मात्र सुधारित किमतीच्या नावावर ३२५ कोटी रुपयांचा वाढीव टेंडर कोणतीही निविदा न काढता मंजूर करण्याचा आला ज्यामध्ये ८८ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप जय जवान जय किसान संघटनेने अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला आहे.... याच प्रमाणे रिच -२ मार्गावरील स्टेशनच्या बांधकामांच्या टेंडरची स्वीकृत किमतीच्या नंतर सुधारित किमतीच्या नावावर मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप प्रशांत पवार यांनी केलाय.... एवढाच नाही तर झिरो माईल स्टेशनच्या किमतीत सुद्धा वाढ करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केलाय....या संपूर्ण गैरव्यवहाराची दाखल सीएनजी ने घेतली असल्याचा दावा त्यांनी केला असून या गैर व्यवहाराची तक्रार भ्रष्ट्राचार विरोधी विभाग कडे दाखल करणार असल्याचे ते म्हणाले आहेत ..
Conclusion: