ETV Bharat / briefs

नाशकात कोरोना संशयित व्यक्तीचा ॲम्बुलन्समधून पळ काढताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Corona patient ambulance escape nashik

ॲम्बुलन्स सुरू होताच संशयित दरवाजा उघडून बाहेर निघाला व स्वतःच्या मोटरसायकलने पळणार तोच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला व तो जागेवरच कोसळला. डॉक्टरांनी त्याला ताबडतोब बघितले व ॲम्बुलन्समधून डॉ. जाकिर हुसेन रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. मृत व्यक्तीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हील रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे.

Social Welfare Department Nashik
Social Welfare Department Nashik
author img

By

Published : Jul 6, 2020, 6:48 PM IST

नाशिक- शहरात 55 वर्षीय कोरोना संशयित व्यक्तीचा ॲम्बुलन्समधून पळ काढताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती कल्याण वसतिगृह येथील कोविड केअर सेंटरमधील एका कोरोनाबाधिताच्या संपर्कात आली होती. कोरोनाच्या भीतीमुळे या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र त्र्यंबके यांनी सांगितले.

सदर संशयित व्यक्तीला 4 जुलै रोजी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. 5 जुलै रोजी त्याचा कोरोना तपासणी नमुना घेण्यात येणार होता. या संशयित्यास कुठलाही प्रकारचा त्रास होत नव्हता. परंतु, त्याने मला खाजगी रुग्णालयात जायचे आहे असे सांगितले. परंतु कोणत्या रुग्णालयात याबाबत त्यानी काहीच सांगितले नाही. डॉक्टरांनी त्याला विविध पर्याय दिले, परंतु त्याला त्यानी नाही म्हणून सांगितले. डॉक्टरांनी त्यास समजवण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु तो काही ऐकण्यास तयार नव्हता म्हणून त्याला शेवटी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात नेण्याकरता अथवा त्याच्या आवडीच्या रुग्णालयात पाठविण्याकरिता ॲम्बुलन्समध्ये बसविण्यात आले.

दरम्यान, ॲम्बुलन्स सुरू होताच संशयित दरवाजा उघडून बाहेर निघाला व स्वतःच्या मोटरसायकलने पळ काढत असताना त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला व तो जागेवरच कोसळला. डॉक्टरांनी त्याला ताबडतोब बघितले व ॲम्बुलन्समधून डॉ. जाकिर हुसेन रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. मृत व्यक्तीचे मृतदेह शवविच्छेदन करीता सिव्हील रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे.

डॉक्टर व आरोग्य कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांसाठी अहोरात्र काम करीत आहेत. परंतु संशयित रुग्णांचा अथवा बाधित रुग्णांचा केवळ भीतीपोटी मृत्यू होणे ही बाब दुर्दैवी असून कुणीही कोरोनाची भीती बाळगू नये. मात्र नियमांचे पालन करावे, असे आवाहन नाशिक महानगर पालिकेतर्फे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.