ETV Bharat / briefs

कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण; जिल्ह्यात 26 नवे कोरोनाबाधित - 26 new corona patients kolhapur

आज आढळलेल्या 26 रुग्णांनंतर सद्यस्थितीत एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 585 झाली आहे. तर आत्तापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 1 हजार 541 वर पोहोचली आहे. त्यातील 917 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Collector office Kolhapur
Collector office Kolhapur
author img

By

Published : Jul 16, 2020, 4:29 PM IST

कोल्हापूर - एकीकडे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता जिल्हाधिकारी कार्यालयातसुद्धा कोरोनाने शिरकाव केला आहे. कार्यालयातील पुरवठा विभागातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने हा विभाग पूर्णपणे बंद करण्यात आला असून विभागातील इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोना रुग्ण आढळल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट बाहेरसुद्धा आता पोलिसांची तैनाती करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी कार्यालयात प्रवेश देण्यात येत आहे. दरम्यान जिल्ह्यात आणखी 26 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 2 जणांचा मृत्यू झाला असून 19 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मृत व्यक्तींमध्ये गडहिंग्लजमधील 58 वर्षीय व्यक्ती, तसेच जयसिंगपूरमधील 75 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

आज आढळलेल्या 26 रुग्णांनंतर सद्यस्थितीत एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 585 झाली आहे. तर आत्तापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 1 हजार 541 वर पोहोचली आहे. त्यातील 917 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे. आज कोल्हापूर शहरात आणखी 13 रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :

आजरा- 97

भुदरगड- 81

चंदगड- 181

गडहिंग्लज- 135

गगनबावडा- 7

हातकणंगले- 42

कागल- 63

करवीर- 126

पन्हाळा- 54

राधानगरी- 75

शाहूवाडी- 195

शिरोळ- 34

नगरपरिषद क्षेत्र- 230

कोल्हापूर महापालिका क्षेत्र-189

असे एकूण 1 हजार 509

तसेच, इतर जिल्हा व राज्यातील 32 असे मिळून एकूण 1 हजार 541 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.