चंद्रपूर - जिल्ह्यात कोरोनाची स्थिती भयावह झाली आहे. मागील 24 तासात तब्बल 937 कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 305 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
3 लाख 2 हजार 608 जणांची टेस्ट
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 33 हजार 529 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 27 हजार 759 झाली आहे. सध्या 5278 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 2 हजार 608 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 लाख 63 हजार 228 निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत्यू झालेल्यांमध्ये जास्त पुरुष
आज कोरोनाने अनेकांचा मृत्यू झाला. यात चंद्रपूर शहराच्या ऊर्जानगर येथील 45 वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील 43 वर्षीय पुरुष व रामनगर येथील 63 वर्षीय पुरुष, बल्लारपूर येथील 29 वर्षीय पुरुष, बावणे लेआऊट वरोरा येथील 51 वर्षीय पुरुष, शेगाव ता. वरोरा येथील 50 वर्षीय पुरुष, घुग्गुस येथील 50 वर्षीय पुरुष, गौराळा ता. भद्रावती येथील 55 वर्षीय महिला, ख्रिस्तानंद चौक, भद्रावती येथील 42 वर्षे पुरुष, संताजी नगर भद्रावती येथील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 492 बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 448, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 19, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 937 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 241, चंद्रपूर तालुका 45, बल्लारपूर 47, भद्रावती 22, ब्रम्हपुरी 56, नागभिड 32, सिंदेवाही 24, सावली 47, गोंडपिपरी सहा, राजूरा 37, चिमूर 73, वरोरा 228, कोरपना 50, जीवती 7 व इतर ठिकाणच्या 13 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला, या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा. स्वत:ची काळजी घ्यावी. तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.