ETV Bharat / briefs

अजब..ठेकेदारामार्फत भर पावसात डांबराने पेन-वडखळ मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती; वाटमारीचा संशय - Pen wadkhal road tar use in rain

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हे नॅशनल हायवेच्या मार्गदर्शनाखाली होत असताना ठेकेदार मात्र तुक लावून काम करीत असल्याचे दिसत आहे. असे असताना नॅशनल हायवेचे अधिकारी यांचे या कामाकडे दुर्लक्ष होत असून यामध्ये अधिकारी आणि ठेकेदार यांची वाटमारी सुरू आहे का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Pen road use of tar in rain
Pen road use of tar in rain
author img

By

Published : Jul 5, 2020, 5:29 PM IST

रायगड- मुंबई गोवा महमार्गाच्या पहिल्या टप्यातील पेण वडखळ रस्त्याचे काम हे 9 वर्षांपासून अद्याप रखडले आहे. या खड्डेमय रस्त्यावर भर पावसात डांबर मारण्याची अजब कल्पना ठेकेदाराने अवलंबली आहे. त्यामुळे आधीच रखडलेल्या महामार्गाच्या कामात ठेकेदाराकडून भर पावसात डांबर टाकून 'तुक' लावण्याचे काम केले जात असल्याने या कामात वाटमारी केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्यातील कामाला 2011 पासून सुरुवात झाली. पळस्पे ते इंदापूर हा पहिला टप्पा असून काही प्रमाणात या रस्त्याचे काम झालेले आहे. मात्र पेण ते वडखळ या रस्त्याचे काम आजही धिम्या गतीने ठेकेदाराकडून सुरू आहे. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की पेण वडखळ रस्ता हा खड्डेमय झालेला असतो. मग त्यावर तुकपट्टी करून तात्पुरती मलमपट्टी ठेकेदार आणि नॅशनल हायवे अधिकाऱ्यांकडून केली जाते. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेहमी खड्डेमय रस्त्यानेच प्रवास करावा लागत आहे.

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही पेण वडखळ रस्ता हा खड्डेमय झाला असून या रस्त्यादरम्यान असलेल्या वाशी नाका याठिकाणी अडीचशे मीटर रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम ठेकेदारामार्फत सुरू आहे. एकीकडे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असताना ठेकेदार महाशयांनी भर पावसात चक्क रस्त्यावर टाकलेल्या खडीवर डांबर मारून खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे पावसाळ्यात डांबर खड्डेमय रस्त्याला पकडून राहण्याचा अजब शोध ठेकेदाराने लावला आहे का, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू आहे.

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हे नॅशनल हायवेच्या मार्गदर्शनाखाली होत असताना ठेकेदार मात्र तुक लावून काम करीत असल्याचे दिसत आहे. असे असताना नॅशनल हायवेचे अधिकारी यांचे या कामाकडे दुर्लक्ष होत असून यामध्ये अधिकारी आणि ठेकेदार यांची वाटमारी सुरू आहे का असा, प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.