मुंबई - लडाखजवळ चीनी सैनिकांद्वारे 20 भारतीय सैनिकांच्या हत्येचा देशभरातून निषेध होत आहे. मुलुंड येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी चीनी सरकारच्या या भ्याड कृत्याचा निषेध करत चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या प्रतिमेचे दहन केले. चीनच्या भ्याड हल्ल्याला भारताने उत्तर द्यावे आणि आपली एक इंच जमीनही चीनकडे जाता कामा नये अशी प्रतिक्रिया काँग्रेस तर्फे व्यक्त करण्यात आली.
एकीकडे सरकारकडून या हल्ल्याबाबत माहिती मिळत नसल्यामुळे देशभरात अनेकांनी आपला रोष व्यक्त केला आहे. काही नागरिकांनी चीनी वस्तूंचा बहिष्कार केला आहे तर काही ठिकाणी चीनी वस्तूंची होळी केली जात आहे. सरकारने काही चीनी करार रद्द देखील केले आहेत. अशा वेळी आपन चीनी वस्तूंचे वापर करू नये, असे काँग्रेस तर्फे आवाहन करण्यात आले आहे.