अहमदनगर- पुणे ते शिर्डीपर्यंत विना परवाना साईबाबांच्या पादुकाची पायी पालखी नेत असताना पुणे जिल्ह्यातील 14 तर अहमदनगर जिल्ह्यातील 1, अशा एकूण 15 जणांवर एक जुलैला राहुरी पोलिसांनी कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले होते. या सर्व जणांवर जमावबंदी व सामाजिक अंतराचे नियम न पाळल्याबाबत कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
एक जुलै रोजी दुपारी साडेबारादरम्यान राहुरी पोलीस ठाणे हद्दीतील कोल्हार खुर्द गावच्या शिवारात साईबाबा मंदिर येथे ऋषीकेश महादेव धुमाळ (वय 40 वर्षे राहणार सर्वे नं. 66 रावीनगर, सुस तालूका मुळशी), आशिष विनायक महाडीक (वय 33 वर्षे राहणार बेलवडेगांव तालूका मुळशी), महेश भरत झेंडे (वय 27 वर्षे राहणार कर्वेनगर कॅनॉलरोड 10 नंबर गल्ली समोर तालूका हवेली), अनिल सुरेश वाल्हेकर (वय 29 वर्षे राहणार डोंजे महादेव मंदिरा शेजारी तालूका हवेली), अनंत सिताराम सुर्यवंशी (वय 48 वर्षे धंदा राहणार वाघोली, रायसोनी कॉलेज समोर तालूका हवेली), संतोष भिमराव शिखरे (वय 39 वर्षे राहणार पिंपळगांव तालूका दौंड), मंगल अनंत सुर्यवंशी (वय 38 वर्षे राहणार रायसोनी कॉलेज समोर वाघोली तालूका हवेली), मनिषा दादाभाऊ सावंत (वय 40 वर्षे राहणार दत्तनगर थेरगाव, आदित्य विले हॉस्पिटल शेजारी आंग्रे चौक पुणे), चैताली दिपक जाधव (वय 38 वर्षे राहणार बापुजीनगर सोसायटी, प्लॉट नं 1087 पद्मावती स्वारगेट), बजरंग कृष्णा पवार (वय 62 वर्षे राहणार येवत स्टेशन रोड तालूका दौंड), वैशाली भरत भोर (वय 45 वर्षे राहणार भिमा कोरेगाव वाजेवाडी तालुका हवेली), मारुती महादेव दुधाने (वय 66 वर्षे राहणार उरण कसबापेठ), अनिल बाळकृष्ण कंदारे (वय 41 वर्षे राहणार वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड), मंदार प्रभाकर शहाणे (वय 53 वर्षे राहणार 373 शनिवार पेठ सर्व राहणार पुणे जिल्हा, तर ऋषीकेश नरेंद्रसिंग परदेशी (वय 23 वर्षे राहणार केडगांव भुषणनगर, रंभाजीनगर, जिल्हा अहमदनगर) हे 15 जण वैद्यकीय तपासणी करून विना परवाना पुणे ते शिर्डी पर्यंत साईबाबांच्या पादुकाची पायी पालखी घेऊन जात होते. यावेळी त्यांच्याकडून सामाजिक अंतर नियमाचे व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले.
त्यामुळे, राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत राक्षे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व जिल्हा बंदीचे आदेश तसेच सामाजिक अंतराचे आदेश धुडकावून लावत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून प्रवास केल्याप्रकरणी सदर व्यक्तींवर कारवाई केली. याबाबत राहुरी पोलिसात पुणे जिल्ह्यातील 14 तर अहमदनगर जिल्ह्यातील 1 अशा एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक आदिनाथ बडे करत आहेत.