ETV Bharat / briefs

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी साधणार जनतेशी संवाद! - Cm uddhav thackeray on corona 30 April 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी जनतेशी संवाद साधून राज्यामध्ये असलेल्या कोरोना परिस्थिती बाबत जनतेला माहिती देणार आहेत.

Cm uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Apr 30, 2021, 12:59 PM IST

मुंबई - आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. राज्यात सुरू असलेले लसीकरण, लसीचा आणि ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आणि एक मे पासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेबद्दल मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी जनतेशी संवाद साधून राज्यामध्ये असलेल्या कोरोना परिस्थिती बाबत जनतेला माहिती देणार आहेत. तसेच उद्यापासून राज्यांमध्ये पंधरा दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय घेण्यामागचे कारण या संवादादरम्यान मुख्यमंत्री जनतेला सांगणार आहेत. यासोबतच सध्या राज्यात सुरू असलेला कडक लॉकडाऊनचा नेमका काय परिणाम समोर आला आहे? लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या प्रादुर्भावावर आवर घालण्यात राज्य सरकारला कितपत यश आले? याचीदेखील माहिती मुख्यमंत्र्यांकडून दिली जाणार आहे.

1 मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेवर करणार भाष्य -

1 मेपासून 18 ते 44 वयोगटात पर्यंत सर्वांना मोफत लसीकरण करण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र, राज्याकडे लस उपलब्ध नसल्याने एक मेला लसीकरण मोहीम सुरू करण्यात राज्य सरकारने असमर्थता दर्शवली आहे. यावर देखील मुख्यमंत्री भाष्य करण्याची शक्यता आहे. तसेच राज्यामध्ये सध्या लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की आलेली आहे.

मुंबईतील लसीकरण केंद्र लस उपलब्ध नसल्याने तीन दिवस बंद ठेवली जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आला. त्यामुळे राज्यात लसीकरणाची नेमकी काय परिस्थिती आहे. यावरदेखील मुख्यमंत्री स्पष्टता असण्याची शक्यता आहे.

ऑक्सिजन निर्मितीवर भाष्य करणार -

काल मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकार्‍यांना आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा बैठक घेतली होती. यामध्ये त्यांनी राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली असून यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यामध्ये ऑक्सिजन जनरेटर प्लांट तयार करण्यासंदर्भातचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यात तिसरी लाट आली तर त्यासाठी राज्य सरकार कशी तयारी करत आहे? यावरदेखील मुख्यमंत्री भाष्य करू शकतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.