ETV Bharat / briefs

'वाघांचा अधिवास वाचवण्यासाठी मेळघाट प्रकल्पातील रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज करू नका'

रेल्वे मार्गांचा विकास व्हायलाच पाहिजे, पण तसे करताना विशेषत: मेळघाटसारख्या ठिकाणी वाघांचे संवर्धन होणे आणि येथील पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे तितकेच महत्वाचे आहे, त्यामुळे ब्रॉडगेजसाठी पर्यायी मार्ग निवडावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Cm Uddhav thackeray
Cm Uddhav thackeray
author img

By

Published : Jul 15, 2020, 6:08 PM IST

मुंबई - मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा अकोला-खांडवा प्रस्तावित रेल्वे गेज परिवर्तन ऐवजी प्रकल्पाबाहेरील इतर पर्यायी मार्ग निवडावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्रान्वये केली आहे.

रेल्वे मंत्रालयाने सध्याच्या अकोला ते खांडवा असे 176 कि. मी. रेल्वे मार्गाला मीटर गेजमधून ब्रॉडगेजमध्ये परिवर्तित करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला असून या रेल्वे मार्गाला लागून 23.48 किमीचे रिअलाईनमेंटही करावे लागणार आहे. त्यामुळे हे रेल्वे मार्गाचे केवळ परिवर्तन करणे नसून, मार्गालगतच्या जागेचे पुन्हा आरेखन करणे होय. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाऐवजी बाहेरून इतर पर्यायी मार्गाचे परिवर्तन करायचे ठरविले, तर एकीकडे दुर्मिळ अशा वाघांच्या अधिवासाला धक्का लावण्याची गरज भासणार नाही. आणि दुसरीकडे जळगाव जामोद आणि संग्रामपूर या तालुक्यांना तसेच आजूबाजूच्या 100 गावांना या नव्या ब्रॉडगेज मार्गाचा फायदा होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे.

मुख्यमंत्री म्हणतात, की 1973-74मध्ये देशातील जाहीर करण्यात आलेल्या 9 व्याघ्र प्रकल्पांमध्ये मेळघाटचा प्रथम क्रमांक लागतो. 2 हजार 768.52 चौ. कि. मी. एवढ्या क्षेत्रावर पसरलेला हा प्रकल्प जागतिकदृष्ट्या प्राधान्याने विकसित प्रकल्पांमध्ये मोडतो. प्रस्तावित ब्रॉडगेजमुळे स्वाभाविकच या भागातून मोठ्या प्रमाणावर रेल्वे वाहतूक वाढेल, परिणामत: प्रकल्पाच्या अगदी गाभ्यातील वन्य प्राण्यांच्या अधिवासाला अडथळा येण्याची शक्यता मुखमंत्री ठाकरे यांनी वर्तवली आहे. शिवाय या परिवर्तनामुळे रेल्वे गाड्यांचा वेगही वाढेल. मुळातच हा गाभा अबाधित व सुरक्षित ठेवण्यासाठी येथील 16 गावे आणि या गाभ्याबाहेरील 6 गावे इतर ठिकाणी पुनर्वसित केली आहेत. ही गावे या रेल्वे मार्गाच्या 10 किमी परीघातातलीच होती. गावांचे पुनर्वसन आणि प्राण्यांच्या अधिवासासाठी प्रयत्न केल्याने येथील वन्य जीव झपाट्याने वाढले, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

भारतीय वन्यजीव संस्थेने देखील या भागातून रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज न करता इतर पर्यायी भागात प्रकल्प राबवावे अशी सुचना केली आहे. केंद्रीय समितीने वन्यजीव राष्ट्रीय बोर्डास देखील मेळघाट प्रकल्पाच्या वन अभयारण्यातील 160.94 हेक्टर वन जमीन रेल्वे मार्ग परिवर्तनासाठी देण्याबाबत पुनर्विचार करावा, असे म्हटले आहे. बोर्डाने राज्य शासनाला हा प्रस्ताव पाठवून विचार करावा असे कळविले आहे. रेल्वे मार्गांचा विकास व्हायलाच पाहिजे, पण तसे करताना विशेषत: मेळघाटसारख्या ठिकाणी वाघांचे संवर्धन होणे आणि येथील पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे तितकेच महत्वाचे आहे, त्यामुळे ब्रॉडगेजसाठी पर्यायी मार्ग निवडावा असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.