ETV Bharat / briefs

सिप्लातर्फे राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीला 3 कोटी रुपयांची मदत - Cipla 3 crore help for corona

सिप्ला या भारतीय बहुराष्ट्रीय औषध कंपनीने 3 कोटी रुपयांची रक्कम राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीत जमा केली आहे.

 Cm Uddhav thackeray
Cm Uddhav thackeray
author img

By

Published : Jul 18, 2020, 4:17 PM IST

मुंबई - राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांना बळ देताना सिप्ला या भारतीय बहुराष्ट्रीय औषध कंपनीने 3 कोटी रुपये राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीत जमा केली आहे. हा धनादेश कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल चोप्रा यांनी नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यावेळी कंपनीचे कॉर्पोरेट हेड निकिल बासवान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

निखिल चोप्रा यांनी कोविड-19 संदर्भात ते करत असलेल्या कामांची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. यावेळी त्यांनी कोविड-19 या विषाणूविरुद्ध लढताना राज्य शासन करत असलेल्या उपायोजनांचे कौतुक केले. या संपूर्ण कालावधीत औषधनिर्माण कंपन्यांना शासनाने उत्तम सहकार्य केल्यामुळेच कोविड-19च्या रुग्णांसाठी उपयुक्त आणि जीवनदायी ठरणाऱ्या औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवता आल्याचेही चोप्रा यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.