ETV Bharat / briefs

'चीन, रशिया, इराण, अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक प्रभावित करण्याच्या प्रयत्नात' - अमेरिका डेमॉक्रेटिक पार्टी

चीन, रशिया आणि इराण यांचा अमेरिकन मतदान प्रक्रिया प्रभावित करण्याच्या प्रयत्न आहे, असे अमेरिकेतील एका गुप्तचर संघटनेच्या प्रमुखाचे म्हणणे आहे. यासाठी हे देश अमेरिकन मतदारांवर परिणाम करणार्‍या मार्गांचा उपयोग करू शकतात, असे ते म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प न्यूज
डोनाल्ड ट्रम्प न्यूज
author img

By

Published : Aug 8, 2020, 6:23 PM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान पदासाठी निवडणुका होणार आहेत. मात्र, याआधी काही विदेशी शक्ती या मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे अहवाल समोर आले आहेत. चीन, रशिया आणि इराण यांचा अमेरिकन मतदान प्रक्रिया प्रभावित करण्याचा प्रयत्न आहे, असे अमेरिकेतील एका गुप्तचर संघटनेच्या प्रमुखाचे म्हणणे आहे. यासाठी हे देश अमेरिकन मतदारांवर परिणाम करणार्‍या मार्गांचा उपयोग करू शकतात, असे ते म्हणाले.

याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक अभियानांमध्ये मदत करण्यासाठी रशियाने 2016 च्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केला होता, असे म्हटले जाते. मात्र, ही बाब रशियाने आतापर्यंत खोडून काढली आहे. गुरुवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत ट्रम्प यांना विचारले गेले की, त्यांनी निवडणुकांमधील हस्तक्षेप रोखण्यासाठी आतापर्यंत कोणती योजना तयार केली आहे ? तेव्हा त्यांनी याविषयी प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगितले.

दरम्यान, डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनीही अमेरिकन गुप्तचर यंत्रणा या वर्षी मतदानामध्ये विदेशी हस्तक्षेपाविषयी जनतेला काहीही माहिती देत नसल्याची तक्रार केली आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प पुन्हा एकदा जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडोन त्यांना टक्कर देणार आहेत.

रशिया जो बिडेन यांना आणि चीन ट्रम्प यांना पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्याचे पाहू इच्छित नाही, असे अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष निवडणुकांआधी रशिया डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बिडेन यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. तर, चीनला ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अध्यक्ष बनू नये, असे वाटते. अमेरिकेत लोकांच्या हिताचे राजकारण आणि चीनच्याही हिताचे राजकारण होईल, असा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. यासाठी त्यांच्याविरोधी राजकीय पक्षांवर दबाव बनवण्याचा जोरदार प्रयत्न होत आहे, असे या गुप्तचर यंत्रणेचे म्हणणे आहे.

नॅशनल काउंटर इंटलिजन्स अँड सिक्युरिटी सेंटरचे प्रमुख विल्यम इव्हानिना यांनी शुक्रवारी निवेदन जारी करत काही विदेश अमेरिकन मतदारांची प्राथमिकता बदलण्यासाठी आणि अमेरिकेच्या राजकारणाला बदलण्यासाठी तसेच, देशात कलह वाढवण्यासाठी आणि अमेरिकन लोकांचा विश्वास कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे म्हटले आहे. अशा कारवाया करण्यात चीन, रशिया आणि इराण यांचा सहभाग असून ते अमेरिकन मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. इराणलाही ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनायला नको आहेत. यासाठी सोशल मीडिया, टीव्हीवरील कार्यक्रम आणि इतर ऑनलाईन माध्यमांचा वापर होत आहे असे विल्यम यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.