चेन्नई - चिंदबरम स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या ४४ व्या सामन्यात मुंबई इंडिन्सने चेन्नईचा ४६ धावांनी पराभव केला. लसिथ मलिंगाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने हा शानदार विजय मिळविला. लसिथ मलिंगाने ३७ धावात ४ बळी घेतले. मुंबईने चेन्नईला १५६ धावांचे आव्हान दिले होते. त्या दिलेल्या लक्ष्याच पाठलाग करताना चेन्नईचा संघ सर्वबाद १०९ धावा केल्या.
१५६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. शेन वॉटसन ८ धावा करुन बाद झाला. मुरली विजयने ३८ धावा केल्या. विजय वगळता इतर कोणत्याही फलंदाजास चांगली कामगिरी करता आली नाही. ड्वेन ब्राव्हो २० आणि मिशेल सँटनर यांनी २२ धावांचे योगदान दिले.
मुंबईकडून कृणाल पंड्याने ७ धावात २ तर जसप्रीत बुमराहने १० धावात २ गडी बाद करुन मलिंगास सुरेश साथ दिली. अनकुल रॉय आणि हार्दिक पंड्या यास प्रत्येकी १ गडी बाद करता आले.
चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत मुंबईच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. मुंबईकडून रोहित शर्माने ४८ चेंडूत ६७ धावा केल्या. त्यात ६ चौकार आणि ३ खणखणीत षटकारांचा समावेश होता. त्यानंतर इव्हिन लेव्हिस ने ३० चेंडूत ३२ धावा कुटल्या. हार्दिक पंड्या आणि किरोन पोलार्ड यांनी प्रत्येकी २३ आणि १३ धावांचे योगदान दिले.
चेन्नईकडून मिशेच सँटनरने १३ धावा देत २ गडी बाद केले. इम्रान ताहिर आणि दीपक चाहर याला प्रत्येकी १ गडी बाद करण्यात यश आले. हरभजन सिंग आणि ड्वेन ब्राव्हो यांना एकही गडी बाद करता आला नाही.