ETV Bharat / briefs

KKR vs CSK: कोलकाताचे चेन्नईपुढे विजयासाठी १०९ धावांचे आव्हान

author img

By

Published : Apr 9, 2019, 7:55 PM IST

Updated : Apr 9, 2019, 10:09 PM IST

आंद्रे रसेलच्या कामगिरीकडे लक्ष लागून राहिले आहे.

धोनी-कार्तिक

चेन्नई - चिंदबरम स्टेडियमवर चेन्नई कोलकाता यांच्यात लढत सुरू आहे. कोलकाताने चेन्नईपुढे विजयासाठी 109 धावांचे आव्हान दिले आहे. आंद्रे रसेलच्या ५० धावांच्या जोरावर कोलकाताने २० षटकात ९ बाद १०८ धावा केल्या. दीपक चाहरने धारदार गोलंदाजी करत २० धावा देत ३ बळी घेतले.

चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दीपक चाहर आणि हरभजन सिंह यांनी भेदक गोलंदाजी करत कोलकाताच्या फलंदाजीस खिंडार पाडले. सुरुवातीला ख्रिस लेन शून्यावर बाद झाला. सुनील नरेन ६ धावा काढून बाद झाला. दिनेश कार्तिकने १९ धावांचे योगदान दिले.

आंद्रे रसेलने ४४ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकार ठोकत ५० धावांची नाबाद खेळी केली. चेन्नईच्या गोलंदाजांचा त्याने चांगलाच समाचार घेतला. कोलकाताच्या ४ फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. इम्रान ताहिरने २१ धावा देत २ गडी बाद केले. हरभजन सिंहला १५ धावात २ गडी बाद करण्यात यश आले. रविंद्र जाडेजाला एकमेव बळी टिपण्यात यश आले.

Intro:Body:

SPORTS 6

Conclusion:
Last Updated : Apr 9, 2019, 10:09 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

KKR vs CSK
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.