सातारा - कासवंड (ता. महाबळेश्वर) एका भाड्याने घेतलेल्या बंगल्यात रात्री शासनाचे नियम तोडून लग्नाची पार्टी केल्याप्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भाड्याने दिल्याप्रकरणी मालक सागर श्रीकांत तराळ याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या पार्टीत कुणाच्याही तोंडावर मास्क नव्हते तसेच मद्यधुंदपणे नाचत होते, असे निदर्शनास आले.
कोरोना महामारीत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असतानाही सातारा शहर तसेच परिसरात विनाकारण फिरणे, विनामास्क फिरणारे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी शहर पोलिसांनी १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले कि, पोवई नाका परिसरात सार्वजनिक रस्त्यावर विनाकारण फिरुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अकिल अमीर काझी (वय ३४, रा. पीरवाडी, सातारा), अभय सुका महाली (वय ५३, रा. भोसले कॉलनी, कोडोली, सातारा), तनुश्री, चैतन्य भिसे (वय २७, रा. वाढेफाटा, सातारा), सुयोग राजकुमार वनारसे (वय ४८, रा. निशिगंधा हौसिंग सोसायटी, एमआयडीसी, सातारा), प्रशांत प्रभाकर सोनमळे (वय ३७, रा. पिरवाडी, सातारा), राजू गुरप्पा चव्हाण (वय २७, संजीवनी सोसायटी, शाहूनगर, सातारा), अल्ताफ जमाल शेख (वय ५५), अत्तार अल्ताफ शेख (वय २०, दोघे रा. रविवार पेठ, सातारा), ओमकार बापूसाहेब कणसे (रा. अंगापूर वंदन, ता. सातारा), विठ्ठल ज्ञानदेव देवगिरी (वय ६६, रा. शिवकृपा अपार्टमेंट, उत्तेकरनगर, सदरबझार, सातारा) सनिराज नामदेव जाधव (वय २५, रा. क्षेत्रमाहुली, सातारा), महम्मद कलाम अमीर शेख (वय ६८, रा. ब्लू प्लाझा अपार्टमेंट, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा), मोहित मगनलाल जैन, वक्ताराम आसाराम देसाई (वय ३०, रा. मोळाचा ओढा, आयटीआय, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
फुलविक्रेत्यावरही कारवाई -
कोरोना महामारीत सातारा शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलल्यानंतरही अजूनही काही जणांकडून त्याचे उल्लंघन होत आहे. पोवई नाक्यावर एका फुल विक्रेत्यावरही कारवाई करण्यात आली. पोवई नाक्यावर मराठा खानावळीच्या शेजारी असणाऱ्या निलकमल फ्लॉवर हे दुकान सुरु ठेवून त्याच्या मालकीची चारचाकी (एमएच १५ - ईपी ३५७५) फुलांनी सजवत होता.