ETV Bharat / briefs

कॅलिफोर्नियात वाहनाची झडती घेत असताना हल्ला; एका पोलिसाचा मृत्यू - Jamison Creek

घटनेतील संशयित आरोपी स्टीव्हन काररिलो हा अटकेदारम्यान जखमी झाला असून त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Jun 7, 2020, 7:14 PM IST

सॅन फ्रान्सिस्को (यूएस) - उत्तर कॅलिफोर्नियातील सांताक्रुझ येथे एका हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱ्यासह 4 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना काल घडली. सार्जंट डामोन गुट्झविल्लर (वय 38) असे मृत पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

एका संशयिताने सार्जंट डामोन गुट्झविल्लर आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या इतर अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याची माहिती शेरिफ जिम हार्ट यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. इतर जखमी अधिकाऱ्यांमध्ये एक सहाय्यक पोलीस अधिकारी आणि कॅलिफोर्निया महामार्ग गस्त अधिकाऱ्याचा समावेश, अशी माहितीही शेरिफ हार्ट यांनी दिली.

एक संशयास्पद व्हॅन ज्यात बंदूक आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य होते, ती जामिसन क्रीकजवळील एका रस्त्याला लागून असल्याची माहिती गुट्झविल्लर यांना 911 क्रमांकाकडून मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी संबंधित वाहनाचा पाठलाग बेन लोमोंड येथील वॉलडेबर्ग येथील एका घराजवळ थांबेपर्यंत केला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी वाहनाची झडती घेण्यास सुरुवात केली, मात्र अचानक त्यांच्यावर गोळीबारासह स्फोटकांचा मारा झाला. या घटनेत सार्जंट डामोन गुट्झविल्लर यांचा मृत्यू झाला तर त्यांच्याबरोबर असणारे इतर अधिकारी जखमी झाले, अशी माहिती शेरिफ हार्ट यांनी दिली.

या घटनेतील संशयित आरोपी स्टीव्हन काररिलो हा अटकेदारम्यान जखमी झाला असून त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.