चेन्नई - आयपीएल मधील चेन्नई सुपर किंग्स या संघाच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. त्यांच्या संघातील मुख्य खेळाडू जायबंदी झाला आहे. ड्वेन ब्राव्हो दोन आठवड्यासाठी बाहेर पडला आहे. धोनीसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. कारण चेन्नईच्या संघातील तो मुख्य खेळाडू आहे.
ड्वेन ब्राव्होचा स्नायू दुखावल्यामुळे तो आयपीएलमधून बाहेर पडला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने चांगले प्रदर्शन केले आहे. त्याने ४ सामन्यात ३९ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत त्याने १६.२८ च्या सरासरीने ७ गडी बाद केले आहेत.
या संघातील खेळाडू नावलैकिकास कामगिरी करत आहे पण या संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. आयपीएलच्या सुरुवातीलाच लुंगी एनगिडी दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्याच्या जागी स्कॉट कुग्गेलेन यास संधी मिळाली.
मुंबई विरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या संघाला पराभवास सामोरे जावे लागले होते. यंदाच्या सीजनमधील त्यांचा हा पहिला पराभव आहे.