डब्लिन - त्रिकोणीय मालिकेत बांगलादेशने विंडीजला ५ गड्यांनी मात देत मालिकेवर कब्जा केला. त्रिकोणीय मालिकेतील अंतिम सामन्यात बांगलादेशचा हा पहिला विजय आहे.
नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. अंतिम सामन्यात विंडजने शाई होप ७४ आणि सुनील अंबरीस ६९ धावांच्या जोरावर २४ षटकात १ बाद १५१ धावा केल्या. त्यानतंर पाऊस सुरू झाल्याने डकवर्थ लुईस नियमाचा उपयोग करण्यात आला. बांगलादेशला विजयासाठी २४ षटकात २१० धावांचे कठीण आव्हान मिळाले.
सौम्य सरकार ६६ आणि मोसद्दिक हुसैन ५२ धावांच्या जोरावर हे आव्हान बांगलादेशने ७ चेंडू राखून पार केले. २१० धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशची सुरुवात खराब झाली. तमीम इकबाल १८ धावांवर माघारी परतला. यानंतर सब्बीर रहमानही शून्यावर बाद झाला. मोसाद्दिक हुसैन याने ५२ धावांची खेळी केली. त्याला सामनावीरचा किताब देऊन गौरविण्यात आले.