ETV Bharat / briefs

कोरोनापासून बचाव करण्यासाठी अक्षय कुमारने मुंबई पोलिसांना दिले 'फिटनेस बॅन्ड' - Akshay Kumar band help

फिटनेस बॅन्ड कोरोना परिस्थितीत शरीराचे ऑक्सिजन, ब्लड प्रेशर पातळी, पल्स रेट इत्यादींवर नजर ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांना मदत करेल.

Health band Akshay Kumar
Health band Akshay Kumar
author img

By

Published : Aug 2, 2020, 6:29 PM IST

मुंबई - कोरोना संकटात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आरोग्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेता अक्षयकुमारला तळमळ असल्याचे दिसून आले आहे. आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत अक्षय कुमारने मुंबई पोलिसांना 1 हजार आरोग्य बँड दिले असून ते मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

शिवाजी पार्क येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकात मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हे बँड देण्यात आले. याची माहिती स्वतः आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून दिली. हे बँड कोरोना परिस्थितीत शरीराचे ऑक्सिजन, ब्लड प्रेशर पातळी, पल्स रेट इत्यादींवर नजर ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांना मदत करेल.

अक्षयने नाशिक पोलिसांना देखील दिले होते बँड

अक्षय कुमारने नेहमीच विविध राज्यांमधील सशस्त्र दल आणि पोलिसांना पाठींबा देत त्यांना मदत केली आहे. कोविड योद्धांबद्दल असलेल्या काळजीबद्दल आदित्य ठाकरे यांनी अक्षयकुमारचे आभार मानले आहे. असेच काही आरोग्य बँड मुंबई महानगरपालिकेकडे देण्याबाबत त्यांनी चर्चा केल्याचे आदित्य यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.