बॉलिवूडचे ज्येष्ठ ऍक्शन डिरेक्टर विरु देवगन यांना आज बॉलिवूडच्या वतीने साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि तंत्रज्ञानी त्यांना अखेरची श्रद्धांजली अर्पण केली.
अमिताभ बचचन, अनिल कपूर, सतीश कौशिक, सुनील शेट्टी, अभिषेक बच्चन, मधुर भांडारकर, सिद्धार्थ रॉय कपूर, रणजीत, विद्या बालन, अशोक पंडित, बोनी कपूर, अर्जुन कपूर यांचा यात समावेश होता. याशिवाय रजा मुराद, शहाबाज खान, पंकज आणि निकेतन धीर, निर्माते धीरज कुमार यांनीही यावेळी आवर्जून हजेरी लावली. विरुजींच्या जाण्याने एक चांगला माणूस आणि तेवढाच उत्तम तंत्रज्ञ आपल्यातून निघून गेल्याची भावना बॉलिवूडमधून व्यक्त होतेय.