नांदेड- शहरातील सांगवी येथील एका 26 वर्षीय विधवा महिलेवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
वसमत येथील 26 वर्षीय महिला नांदेड शहरातील सांगावी येथे आपल्या नातेवाईकांच्या घरी आली होती. येथे शेजारी राहणाऱ्या चार नराधमांनी सोमवारी (13 जुलै) रात्री घरात घुसून पीडितेला आणि तिच्या नातेवाईकास मारहाण केली. पीडितेने प्रतिकार केला असता चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
या प्रकरणानंतर सांगवी परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर तिघे फरार आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी दिली.