सोलापूर- पंढरपूर शहर आणि तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून 25 पेक्षा अधिक नवे करोबाधित रुग्ण आढळले आहेत. करोनामुळे पंढरपुरात 80 वर्षाच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर, आज एक नवा कोरोना रुग्ण आढळला असून रुग्णसंख्या 33 वर गेली आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेली व्यक्ती ही पंढरपूर येथील तालुका पोलीस परिसरातील राहणारी होती. 28 जून रोजी त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार चालू असताना बुधवारी सकाळी त्यांचा मुत्यू झाला. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याचबरोबर, आज रुक्मिणी नगर येथील एका महिलेला कोरोनाची लागन झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून, यात प्रदक्षिणा मार्गावर, नवी पेठ, जुनी पेठ, लिंक रोड, गणेश नगर, भक्ती मार्ग, कराड नाका, रुक्मिणी नगर, करकंब गाव भागात कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत.
तसेच, पंढरपुरात 25 जणांवर उपचार चालू आहे. तर 7 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. पंढरीतील कोरोनाबाधितांची संख्या 33 वर गेली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना वाखरी येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे.