अकोला- जिल्ह्यात आज 8 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच 15 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 2 महिला व 6 पुरुष असून त्यातील 6 जण बोरगाव मंजू येथील, एक जण मूर्तिजापूर येथील, तर अन्य एक जण अकोली जहागीर (ता. अकोट) येथील रहिवासी आहे.
दरम्यान, आज मृत्यू झालेले दोन्ही रुग्ण हे पुरुष असून त्यातील एक 76 वर्षीय आहे, तर अन्य 54 वर्षीय रुग्ण आहे. हे दोघेही जण अकोट येथील रहिवासी आहेत. आज दुपारनंतर कोविड केअर सेंटरमधून 10, आयकॉन रुग्णालयातून 3 व हॉटेल रिजेन्सीमधून 2 अशा 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
प्राप्त अहवालानुसार आकडेवारी
प्राप्त अहवाल-229
पॉझिटिव्ह- 8
निगेटिव्ह- 221
सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- 2065
मृत-101
डिस्चार्ज- 1682
दाखल रुग्ण (अॅ क्टिव्ह पॉझिटिव्ह)- 282